आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाबरी विध्वंस निकाल थोडक्यात:10 पॉइंट्समध्ये जाणून घ्या 2000 पानांच्या निकालातील सर्वात महत्वाच्या बाबी, 28 वर्षांनंतर अशी झाली निर्दोष सुटका

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • कूण 48 लोकांवर आरोप लावण्यात आले होते, यामधील 16 जणांचा मृत्यू झाला आहे.

बाबरीची वादग्रस्त रचना उद्ध्वस्त करण्याबाबत लखनऊच्या विशेष कोर्टाने बुधवारी मोठा निर्णय दिला. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह 32 आरोपींना न्यायाधीश एस.के. यादव यांना निर्दोष मुक्त केले. एकूण 48 लोकांवर आरोप लावण्यात आले होते, यामधील 16 जणांचा मृत्यू झाला आहे. निर्णय देणारे न्यायाधीश आजच रिटायर्ड होत आहेत.

सीबीआयच्या स्पेशल कोर्टाच्या निर्णयाच्या 10 मोठ्या गोष्टी

 1. या प्रकरणात कोणत्याही प्रकारच्या कटाचे पुरावे मिळाले नाहीत.
 2. रचना पाडण्याची घटना अचानक झाली होती, ही घटना नियोजित नव्हती.
 3. अज्ञात लोकांनी वादग्रस्त रचना पाडली. आरोपी बनवण्यात आलेल्या लोकांचा घटनेची काहीच संबंध नव्हता.
 4. सीबीआय 32 आरोपींचा गुन्हा सिद्ध करताना पुरावे सादर करण्यात अयशस्वी ठरली.
 5. साक्षीदाराच्या जबाबानुसार कारसेवासाठी जमा झालेल्या जमावाचा हेतू बाबरीची रचना पाडण्याची नव्हती.
 6. अशोक सिंघल रचना सुरक्षित ठेवू इच्छित होते कारण तेथे मूर्ती होत्या.
 7. वादग्रस्त ठिकाणी रामललाच्या मूर्ती होत्या. कारसेवकांनी ती रचना पाडली असती तर मूर्तीलाही नुकसान पोहोचले असते. कारसेवकांनी दोन्ही हात व्यस्त ठेवण्यासाठी जल आणि फूल आणण्यास सांगितले होते.
 8. वृत्तपत्रांमध्ये लिहिलेल्या गोष्टींना पुरावा मानू शकत नाही. पुराव्याच्या स्वरुपात केवळ फोटो आणि व्हिडिओ होते.
 9. व्हिडिओ डेम्पर्ड होते.ज्याच्या अधुनमधून न्यूजही होत्या. यामुळे याला विश्वासार्ह पुरावे मानले जाऊ शकत नाही.
 10. चार्टशीटमध्ये फोटो सादर करण्यात आले होते, मात्र यामध्ये जास्तीत जास्त निगेटिव्ह कोर्टात सादर करण्यात आले नाहीत. यामुळे फोटोही प्रामाणिक पुरावे नाहीत.

हे होते 32 आरोपी
लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, उमा भारती, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, महंत नृत्य गोपाल दास, डॉ. राम विलास वेदांती, चंपत राय, महंत धर्मदास, सतीश प्रधान, पवन कुमार पांडेय, लल्लू सिंह, प्रकाश शर्मा, विजय बहादुर सिंह, संतोष दुबे, गांधी यादव, रामजी गुप्ता, ब्रज भूषण शरण सिंह, कमलेश त्रिपाठी, रामचंद्र खत्री, जय भगवान गोयल, ओम प्रकाश पांडेय, अमरनाथ गोयल, जयभान सिंह पवैया, साक्षी महाराज, विनय कुमार राय, नवीन भाई शुक्ला, आरएन श्रीवास्तव, आचार्य धर्मेंद्र देव, सुधीर कुमार कक्कड आणि धर्मेंद्र सिंह गुर्जर

Open Divya Marathi in...
 • Divya Marathi App
 • BrowserBrowser