आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मनीष सिसोदियांची सीबीआय कोठडी सोमवारपर्यंत वाढली

नवी दिल्ली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अबकारी धोरणातील घोटाळ्याच्या आरोपात अटकेतील माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सीबीआय रिमांड दोन दिवस वाढवण्यात आली आहे. सीबीआयने आणखी तीन दिवसांची मागणी केली होती. कोर्टाने त्यांना सोमवारी हजर करण्याचे आदेश दिले. विशेष सीबीआय कोर्टाचे एम.के. नागपाल यांच्यासमोर शनिवारी सीबीआयचे वकील म्हणाले, मनीष सिसोदिया अद्यापही चौकशीत सहकार्य करत नाहीत. त्याचबरोबर दोन जणांच्या समोरासमोरील चौकशीसाठी रिमांड हवी आहे.

सिसोदियांच्या बाजूने वकील दयनकृष्णन यांनी सीबीआयच्या मागणीला विरोध दर्शवला. सुनावणीदरम्यान सिसोदिया स्वत:च म्हणाले, सीबीआय अधिकारी माझी काळजी घेत आहेत. आदराने वागत आहेत. गरजेच्या सगळ्या वस्तूही उपलब्ध करून देत आहेत. थर्ड डिग्रीचा वापर करत नाहीत. परंतु ते मला दररोज ९ ते १० तास बसून ठेवत आहेत आणि एकच प्रश्न वारंवार विचारत आहेत. ही गोष्टी मानसिक छळापेक्षा कमी नाही. त्यावर कोर्टाने सीबीआयला आदेश दिले.

बातम्या आणखी आहेत...