आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • CBI Director Selection Today; A Committee Of Prime Minister, CJI And Leader Of Opposition Will Take The Decision

उच्चस्तरीय बैठक:सीबीआय संचालकांची निवड आज; पंतप्रधान, CJI आणि विरोधी पक्षनेते यांची समिती घेणार निर्णय

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुबोध कुमार यांचा कार्यकाळ वाढण्याचीही शक्यता

सीबीआय संचालकांच्या निवडीसाठी शनिवारी उच्चस्तरीय बैठक होऊ शकते. त्यात पंतप्रधान, CJI आणि विरोधी पक्षनेते यांचा समावेश असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, समिती सुबोध कुमार जयस्वाल यांचा कार्यकाळ वाढवू शकते. त्यांचा 2 वर्षांचा कार्यकाळ 25 मे रोजी संपणार आहे.

महाराष्ट्र केडरचे 1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त जयस्वाल यांनी 26 मे 2021 रोजी सीबीआयची सूत्रे हाती घेतली.

जयस्वाल हे हेरांचे सूत्रधार

वरिष्ठ आयपीएस अधिकारी सुबोध जयस्वाल हे निष्कलंक प्रतिमेचे अधिकारी मानले जातात. पोलिस सेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना 2009 मध्ये राष्ट्रपती पोलिस पदकही मिळाले आहे. जयस्वाल हे हेरांचे मास्टर म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RAW) मध्येही काम केले आहे. ते कॅबिनेट सचिवालयात अतिरिक्त सचिवही राहिले आहेत. जयस्वाल यांनी अनेक मोठ्या प्रकरणांच्या तपासाचे नेतृत्व केले आहे.

मुंबई पोलिसात असताना ते कोट्यवधींच्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या विशेष पथकाचे प्रमुख होते. सुबोधकुमार जयस्वाल यांनी 2006 साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाचाही तपास केला होता. त्यांनी पंतप्रधान, माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबियांचे संरक्षण करणाऱ्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) च्या इंटेलिजन्स ब्युरोमध्येही काम केले आहे.

सुबोध कुमार जयस्वाल हे 1985 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी आहेत.
सुबोध कुमार जयस्वाल हे 1985 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी आहेत.

कार्यकाळ पाच वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो
सीबीआय संचालकांची निवड उच्चस्तरीय समितीमार्फत केली जाते. त्यात पंतप्रधान, भारताचे सरन्यायाधीश आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांचा समावेश होतो. त्याचा कालावधी दोन वर्षांचा असतो, परंतु पाच वर्षांपर्यंत वाढवता येतो.

सीबीआय प्रमुखाची निवड आयपीएस अधिकाऱ्यांच्या सर्वात वरिष्ठ बॅचमधून
या पदासाठी 1984 ते 1987 दरम्यानच्या सर्वात वरिष्ठ IPS बॅचच्या अधिकाऱ्यांच्या नावांचा विचार केला जातो. निवड समिती ज्येष्ठता, सचोटी, भ्रष्टाचारविरोधी प्रकरणांच्या तपासाचा अनुभव या आधारावर सीबीआय संचालकाची निवड करते.