आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ती:कर्नाटकचे DGP प्रवीण सूद CBI डायरेक्टर; निकालानंतर दुसऱ्याच दिवशी आदेश, शिवकुमार त्यांना 'नालायक' म्हणाले होते

नवी दिल्ली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रवीण सूद 1986 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. डीके शिवकुमार यांनी त्यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांप्रमाणे वागत असल्याचा आरोप केला होता. - Divya Marathi
प्रवीण सूद 1986 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. डीके शिवकुमार यांनी त्यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांप्रमाणे वागत असल्याचा आरोप केला होता.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी राज्याचे पोलिस महासंचालक (डीजीपी) प्रवीण सूद यांची CBI च्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्राने रविवारी त्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले.

1986 बॅचचे IPS अधिकारी सूद 2 वर्षांपर्यंत या पदावर राहतील. ते मे 2024 मध्ये निवृत्त होतील. पण या नियुक्तीसोबतच त्यांचा कार्यकाळही मे 2025 पर्यंत वाढवण्यात आला आहे. CBI चे विद्यमान संचलाक सुबोध कुमार जायस्वाल यांचा कार्यकाळ येत्या 25 तारखेला संपुष्टात येणार आहे. सूद त्याच दिवशी आपल्या पदाची सूत्रे हाती घेऊ शकतात.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांनी डीजीपी प्रवीण सूद यांचा नालायक म्हणून उल्लेख केला होता. ते 14 मार्च रोजी म्हणाले होते की, आमचे डीजीपी नालायक आहेत. ते या पदासाठी पात्र नाहीत. ते 3 वर्षांपासून राज्याच्या पोलिस महासंचालकपदी आहेत. पण एखाद्या भाजप कार्यकर्त्यासारखे काम करतात. त्यांच्यावर तत्काळ FIR झाला पाहिजे.

शिवकुमार यांनी आरोप केला होता की, सूद यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर 25 गुन्हे दाखल केले. पण भाजप नेत्यांवर एकही गुन्हा दाखल केला नाही. आम्ही निवडणूक आयोगाकडेही यासंबंधी तक्रार केली आहे. त्यांनी प्रवीण सूद यांच्या अटकेचीही मागणी केली होती. निवडणुकीनंतर काँग्रेसचे सरकार आल्यास सूद यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे शिवकुमार म्हणाले होते.

प्रवीण सूद मूळचे हिमाचलचे, 22व्या वर्षी झाले आयपीएस

प्रवीण सूद यांची 2020 मध्ये कर्नाटकच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. ते आपली पत्नी व मुलगी आशितासोबत दिसून येत आहेत.
प्रवीण सूद यांची 2020 मध्ये कर्नाटकच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. ते आपली पत्नी व मुलगी आशितासोबत दिसून येत आहेत.

प्रवीण सूद हिमाचल प्रदेशच्या कांगडा येथील आहेत. ते आयआयटी दिल्लीचे पदवीधर आहेत. त्यांनी आयआयएम बंगळुरूमधून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. वयाच्या 22 व्या वर्षी ते पोलिस सेवेत रुजू झाले. ते बेल्लारी व रायचूरचे एसपी होते. याशिवाय त्यांनी बंगळुरू व म्हैसूरचे डीसीपी म्हणूनही काम केले आहे.

सूद यांना 1996 मध्ये मुख्यमंत्र्यांकडून सुवर्णपदक मिळाले. याशिवाय 2002 मध्ये पोलिस पदक व 2011 मध्ये विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींच्या हस्ते पोलिस पदक मिळाले. जून 2020 मध्ये प्रवीण सूद यांची कर्नाटकच्या डीजीपीपदी नियुक्ती करण्यात आली.

क्रिकेटपटू मयंक अग्रवाल जावई

आशिता सूदचा 2018 मध्ये क्रिकेटर मयंक अग्रवालशी साखरपुडा व 2022 मध्ये लग्न झाले.
आशिता सूदचा 2018 मध्ये क्रिकेटर मयंक अग्रवालशी साखरपुडा व 2022 मध्ये लग्न झाले.

प्रवीण सूद यांच्या पत्नी विनिता सूद या सामाजिक उद्योजिका आहेत. त्यांना 2 मुली आहेत. एक मुलगी आशिता सूद कायद्याची पदव्युत्तर पदवीधर आहे. आशिताचा 2018 मध्ये क्रिकेटर मयंक अग्रवालसोबत साखरपुडा झाला. त्यानंतर 2022 मध्ये त्यांचे लग्न झाले. मयंक अग्रवाल बंगळुरूचा रहिवासी आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो कर्नाटककडून खेळतो. सध्याच्या आयपीएल हंगामात तो सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे. मयंकने टीम इंडियासाठी 21 कसोटी सामन्यांत 1488 धावा व 5 एकदिवसीय सामन्यांत 86 धावा केल्या आहेत.

ही 3 नावे होती चर्चेत

यासंबंधीच्या वृत्तानुसार, प्रवीण सूद (डीजीपी कर्नाटक) यांच्यासह मध्यप्रदेशचे डीजीपी सुधीर सक्सेना व वरिष्ठ आयपीएस अधिकारी ताज हसन सीबीआय संचालकपदाच्या शर्यतीत होते. पण सूद यांनी यात बाजी मारली.

सीबीआय संचालकांची निवड उच्चस्तरीय समितीमार्फत केली जाते. त्यात पंतप्रधान, भारताचे सरन्यायाधीश व लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याचा समावेश असतो. हा कालावधी 2 वर्षांचा असतो. त्यानंतर तो 5 वर्षांपर्यंत वाढवता येतो. या समितीची गत शनिवारी बैठक झाली. त्यात उपरोक्त नमूद 3 अधिकाऱ्यांच्या नावांची निवड करण्यात आली होती.

सर्वात सीनिअर आयपीएस अधिकाऱ्यांच्या बॅचमधून केली जाते निवड

सीबीआय संचालक पदासाठी 1984 ते 1987 दरम्यानच्या सर्वात सीनिअर IPS बॅचच्या अधिकाऱ्यांच्या नावांचा विचार केला जातो. निवड समिती ज्येष्ठता, सचोटी, भ्रष्टाचारविरोधी प्रकरणांच्या तपासाचा अनुभव या आधारावर सीबीआय संचालकाची निवड करते.

सीबीआय केंद्र सरकारच्या अखत्यारीत काम करते

  • सीबीआय थेट केंद्र सरकारच्या अखत्यारीत काम करते. म्हणून तिला सर्वात शक्तिशाली एजन्सी म्हटले जाते. कोणतेही राज्य सरकार केंद्राला कोणत्याही प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची विनंती करू शकते. पण याविषयीचा अंतिम निर्णय केंद्र सरकारचा असतो.
  • केंद्र, सुप्रीम किंवा हाय कोर्टाने निर्देश दिल्यानंतरच सीबीआयला राज्य पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्याचा तपास करता येतो. डीएसपीई कायद्यांतर्गतही सरकार सीबीआय चौकशी करू शकते.