आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • CBI Interrogates Nephew Abhishek And Wife For Two Hours News And Upadates In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोळसा घोटाळ्यात अडकले ममतांचे कुटुंबीय:सीबीआयकडून भाचा अभिषेक आणि पत्नीची पावणे दोन तास चौकशी; केंद्राकडून सीबीआयचा गैरवापर होतोय -तृणमूल

कोलकाता11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इनकम सोर्स आणि कथित शेल कंपन्यांबद्दल झाली विचारणा

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या वातावरणात सीबीआय चौकशीच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचे कुटुंब सीबीआयच्या रडारवर आहेत. ममतांचा भाचा अभिषेक, सून रुजिरा, सुनेची बहीण मेनका आणि अभिषेक यांच्या काही मित्रांवर सुद्धा कोळसा घोटाळ्याचे आरोप करण्यात आले आहेत. पण, निवडणुकीत केंद्र सरकार दबाव आणण्यासाठी सीबीआयचा वापर करत असल्याचे आरोप सत्ताधारी तृणमूलकडून केले जात आहेत.

कोळसा घोटाळ्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांची सून रुजिरा हिच्यासोबत सीबीआयने मंगळवारी जवळपास पावणे दोन तास चौकशी केली. सूत्रांच्या माहितीनुसार, सीबीआयने रुजिरा हिला पैशांचा व्यवहार आणि अचानक वाढलेल्या संपत्तीसंबंधी काही प्रश्न उपस्थित केले होते. चौकशी दरम्यान रूजिरासोबत तिचे पती अभिषेक बॅनर्जी उपस्थित होते.

सीबीआयच्या आधीच सीएम ममता पोहचली भाच्याचा घरी

संबंधित प्रकरणामध्ये चौकशीसाठी सीबीआय अभिषेक यांच्या घरी पोहचण्याच्या आधीच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या भाच्याचे घर गाठले. ममता यांनी आपल्या भाच्याचा घरी 10 मिनटे घालवली आणि जातांना आपल्या आठ वर्षाच्या नातीला सोबत घेऊन गेली. यापूर्वी सोमवारी सीबीआयने अभिषेक यांची मेव्हूनी मेनका यांची जवळपास तीन तास चौकशी केली होती. या प्रकरणात अभिषेक यांच्या जवळील काही मित्र सीबीआयच्या तावडीत सापडले आहे.

सीबीआयच्या कारवाईवर तृणमूल संतापला

कोळसा घोटळ्याप्रकरणी सीबीआयने अभिषेक यांच्या जवळील मित्राच्या घरी आणि ऑफीसवर छापेमारी टाकल्यामुळे तृणमूल काँग्रेसचे नेते संतापले आहे. त्यांचे आरोप आहे की, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सीबीआयचा गैरवापर करत आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय म्हणाले की, भाजपाला कोणी मित्र पक्ष नसून सीबीआय आणि ईडी हेच त्यांचे मित्र आहेत, याबळावर ते इतर पक्षांना धमकावू पाहत आहेत. आमच्या पक्षांवरही दबाव टाकत असून पक्षातील काही नेत्यांना नोटीस जारी केली आहे. पण आम्ही या विरोधात कायद्याने लढणार आहोत.

भाजपने सांगितले चुकीचे काम करणाऱ्याला भीती

तृणमूल काँग्रेसच्या आरोपांवर प्रत्यारोप करताना भाजपचे पश्चिम बंगाल अध्यक्ष दिलीप घोष यांनी सांगितले की, सीबीआयने संबंधित प्रकरणाचा तपास आधीपासूनच सुरू केलेला आहे. हे पहिल्यांदाच घडले नसून सीबीआय त्यांच्या चौकटीत राहून काम करत आहे. तृणमूलचे नेते यामुळे घाबरत आहेत, कारण त्यांनी चुकीचे काम केले आहे. जे लोक चुकीचे काम करतात, तेच लोक घाबरतात.

शुक्रवारी 13 ठिकाणांवर छापे टाकले

संबंधित प्रकरणात सीबीआयने शुक्रवारी राज्याच्या पुरुलिया, बांकुरा, बर्दवान आणि कोलकतातील 13 स्थळांवर छापे टाकले. ही छापेमारी युवा तृणमूल काँग्रेसचे नेते विनय मिश्रा, व्यापारी अमित सिंह आणि नीरज सिंह यांच्या ठिकाणी टाकण्यात आली होती. छापेमारी दरम्यान घरात कोणी उपस्थित नसून 11 जानेवारीला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हुगळी, कोलकता, उत्तर 24 परगना, आसनसोल, दुर्गापूर, वर्धमान येथे छापे टाकले होते.

टीएमसी नेत्यावर होत आहे आरोप

कोळसा घोटाळा प्रकरणी टीएमसी नेत्यावर आरोप होत असून यात अभिषेक बॅनर्जीच्या नावाचा देखील समावेश आहे. आरोप आहेत की, बंगालमध्ये कित्येक हजार कोटी कोळशाचे अवैधरित्या उत्खनन झाले असून रॅकेटच्या माध्यमातून ते काळ्या बाजारात विकण्यात आले. संबंधित प्रकरणामध्ये सीबीआयने डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कोलकताचे सीए गणेश बगारियाच्या कार्यालयावर देखील छापे टाकले होते.

सप्टेंबरमध्ये चौकशी सुरू; कोर्टाने सीबीआयला मंजुरी दिली

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कोळसा घोटाळ्याची चौकशी सुरू झाली होती, तेव्हापासून भाजप सतत याप्रकरणी टीएमसीवर आरोप करत आहे. भाजप नेत्यांच्या मते, टीएमसी नेत्यांनी कोळसा घोटळ्यातील काळा पैसा बनावट कंपन्यांच्या माध्यमातून पांढऱ्या पैशामध्ये रुपांतरित केला. यात सर्वात जास्त फायदा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी याला झाला.

अभिषेक बनर्जी टीएमसीच्या युवा आघाडीचे अध्यक्ष असून त्यांनी आपल्या पक्षात विनय मिश्रा यांच्यासह 15 तरुणांना सरचिटणीस बनवले होते. कोळशा घोटळ्याप्रकरणी विनय मिश्रा यांच्यावर आधीपासूनच आरोप आहेत. टीएमसीने सीबीआय चौकशी थांबवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु, हायकोर्टाने ती फेटाळली.

बातम्या आणखी आहेत...