आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्पन्नापेक्षा जास्त संपत्तीच्या प्रकरणात वॉटर अँड पॉवर कन्सल्टन्सीचे माजी सीएमडी राजेंद्र कुमार गुप्ता आणि त्यांचे पुत्र गौरव सिंघल यांना सीबीआयने बुधवारी अटक केली. तपास संस्थेने मंगळवारी त्यांच्या दिल्लीसह 19 ठिकाणांवर धाड टाकली होती. पहिल्या दिवशी त्यांच्या घरातून 20 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. बुधवारच्या कारवाईत हा आकडा 38 कोटींवर पोहोचला.
तपास संस्थेने राजेंद्र कुमार गुप्ता आणि गौरव सिंघल यांच्या दिल्ली, चंदिगड, गुरुग्राम, सोनिपत आणि गाझियाबादसह 19 ठिकाणांवर धाड टाकली. यात कॅश, इतर मौल्यवान सामान आणि संपत्तीची कागदपत्रे जप्त करण्यात आली.
गुप्तांचा वॅपकोसमधील कार्यकाळ 1 एप्रिल 2011 ते 31 मार्च 2019 पर्यंत राहिला. तपास संस्थेने यादरम्यान गोळा केलेल्या संपत्तीच्या प्रकरणात केस नोंदवली होती.
मंगळवारी 20 कोटी रोकड जप्त केलीः सीबीआय
पीटीआयनुसार सीबीआयच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, रोख आणि मौल्यवान दागिन्यंसह आरोपींची कथित अचल संपत्तीही समोर आली आहे. यात फ्लॅट, व्यावसायिक संपत्ती, दिल्ली, गुरूग्राम, पंचकुला, सोनिपत आणि चंदिगडमधील फार्म हाऊसचा समावेश आहे. आरके गुप्ता आणि त्यांच्या कुटुंबावर निवृत्तीनंतर दिल्लीत एक प्रायव्हेट कन्सलटन्सी बिझनेस स्थापन केल्याचाही आरोप आहे.
कोण आहेत आरके गुप्ता
राजेंद्र कुमार गुप्ता हे केंद्रीय जलशक्ती मंत्रायलाअंतर्गत येणाऱ्या वॅपकोस लिमिटेडचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. ही एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. याची मालकी केंद्राकडे आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालय याचे संचालन करते. राजेंद्र गुप्ता 2018 मध्ये याचे सीएमडी बनले होते. सीएमडी झाल्यावर त्यांच्यावर भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कोट्यवधींची कमाई केल्याचा आरोप झाला होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.