आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखत निर्यात सबसिडीत भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून सीबीआयने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे बंधू अग्रसेन गहलोत यांच्यासह अन्य १४ विरोधात एफआयआर नोंदवला आहे. शुक्रवारी जोधपूरच्या मंडोर येथील अग्रसेन यांच्या निवासस्थानासह ३ राज्यांत १६ ठिकाणी सीबीआय पथक पोहोचले. ६० हून अधिक अधिकाऱ्यांनी गुजरात, राजस्थान आणि प.बंगालमध्ये छापे टाकले. एफआयआरमध्ये अग्रसेन यांच्याशिवाय दीनदयाल वोहरा, अमृतलाल बंडी, ब्रजेश जयराम नाथ, नितीन शहा, सुनील शर्मा, प्रवीण सराफ व इतरांचीही नावे आहेत. हे प्रकरण पोटॅश म्युरिएटच्या आयातीतील भ्रष्टाचाराशी संबंधित आहेत. ते सरकारकडून मिळणाऱ्या ८० टक्के सबसिडीवर शेतकऱ्यांना वितरित केले जाणार होते. २००७-०८ दरम्यान मागवलेल्या पोटॅश म्युरिएटची निर्यात दक्षिण पूर्वेतील आशियाई देश, सौदी अरेबिया आणि अन्य बाजारांत “औद्योगिक सॉल्ट’च्या रूपात केली. सबसिडीही बनावट देवाणघेवाणीच्या आरोपांनी घेरली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.