आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • CBI Raids In Jammu And Kashmir, Delhi And Madhya Pradesh, Agency Raids 14 Places In Fake Gun License Cases

छापेमारी:जम्मू-काश्मीर, दिल्ली आणि मध्यप्रदेशात CBI ची छापेमारी, बनावट गन लायसन्स प्रकरणात 14 ठिकाणांवर एजन्सीची छापेमारी

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीबीआयने जवळपास 3 महिन्यांपूर्वी काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन चालवून 40 ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी केली होती.

बनावट गन लायसन्स प्रकरणात सीबीआयने जम्मू-काश्मीर, दिल्ली आणि मध्य प्रदेशातील 14 ठिकाणांवर मंगळवारी सर्च ऑपरेशन चालवले. या दरम्यान माजी IAS अधिकारी आणि जम्मू-काश्मीरचे उपराज्यपालचे सल्लागार राहिलेले बशीर अहमद खान यांच्या घराची झडती घेण्यात आली.

यापूर्वी सीबीआयने जवळपास 3 महिन्यांपूर्वी काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन चालवून 40 ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी केली होती. या दरम्यान 2 वरीष्ठ आयएएस अधिकारी शाहिद इकबाल चौधरी आणि नीरज कुमार यांच्या घराची देखील झडती घेण्यात आली होती. दोघांवरही 2 लाख बनावट लायसन्स जारी करण्याच्या प्रकरणात सामिल असण्याचा आरोप होता.

सरकारी आकड्यांनुसार, जम्मू-कश्मीर गन लायसेन्स जारी करण्याच्या प्रकरणात देशात टॉपवर आहे. येथे 2018 पासून 2020 पर्यंत सर्वात जास्त हत्यार लायसन्स जारी करण्यात आले. या दोन वर्षांमध्ये देशभरात 22,805 लायसन्स जारी करण्यात आले. यामधून 18,000 एकट्या जम्मू-काश्मीरमध्ये जारी झाले आहेत. म्हणजेच देशाच्या 81% लायसेन्स येथे वितरीत करण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...