आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदाबादच्या विशेष सीबीआय न्यायायाने हवाई दलाच्या 2 सेवानिवृत्त व एका वर्किंग अधिकाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. 1995 साली झालेल्या एका 'कूक'च्या हत्येप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली.
गुजरातच्या जामनगर स्थित हवाई दलाच्या केंद्रावर गिरिजा रावत नामक स्वयंपाक्याचा नोव्हेंबर 1995 मध्ये कँटिनमधून मद्य चोरी केल्याप्रकरणी छळ करण्यात आला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. विशेष न्यायाधीश एन.डी. जोशी यांच्या न्यायालयाने जामनगर एअरफोर्स -1 चे तत्कालीन स्क्वाड्रन लिडर अनूप सूद व तत्कालीन सार्जंट के.एन. अनिल व सार्जंट महेंद्र सिंह सहरावत यांना या प्रकरणी दोषी घोषित केले.
7 आरोपी, 3 निर्दोष, एकाचा मृत्यू
या प्रकरणी एकूण 7 जण आरोपी होती. यातील तिघांची कोर्टाने निर्दोष सुटका केली. तर एका आरोपीचा सुनावणीदरम्यान मृत्यू झाला. सूद हवाई दलाच्या ग्रुप कॅप्टनपदावरून निवृत्त झालेत. ते सोशल मीडिया प्रोफाईलमध्ये स्वतःची ओळख प्रोग्राम स्पीकर व एनएसजी ट्रेंड कमांडो म्हणून करवून देतात. अनिलही एअरफोर्समधून रिटायर झालेत. सहरावतही अद्याप सेवारत आहेत.
हाय कोर्टाने करविली सीबीआय चौकशी
रावत यांच्या पत्नीच्या याचिकेनुसार गुजरात हाय कोर्टाने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर 22 फेब्रुवारी 2012 रोजी सीबीआयने या गुन्ह्याचा तपास आपल्या हाती घेतला होता.
सीबीआय प्रवक्ते आर.सी. जोशी यांनी सांगितले -'13 नोव्हेंबर 1995 रोजी स्क्वाड्रन लिडर अनूप सूद यांच्यासह हवाईदल पोलिसांच्या 10 ते 12 अधिकाऱ्यांनी रावत यांच्या निवासस्थानाची झडती घेतली. त्यांनी रावत यांना कँटीनमधून मद्य चोरी केल्याचा आरोप कबूल करण्यासाठी मजबूर केले. रावत यांची पत्नी त्याच दिवशी त्यांची सुटका करण्यासाठी गार्ड रुममध्ये गेली होती. त्यावेळी त्यांना त्यांच्या पतीची लवकरच सुटका केली जाईल असे सांगण्यात आले. पण, त्यानंतर अचानक 14 नोव्हेंबर 1995 रोजी रावत यांच्या पत्नीला त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात येवून त्यांचा मृतदेह घेऊन जाण्यास सांगितले.'
2013 मध्ये आरोपपत्र दाखल
जोशींनी सांगितले की, 'सीबीआयने या प्रकरणाचा सखोल तपास करुन 30 जुलै 2013 रोजी आरोपींविरोधात गुन्हेगारी कट व हत्येचे आरोपपत्र दाखल केले. कनिष्ठ न्यायालयाने नुकतीच त्यांना शिक्षा सुनावली.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.