आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Cbsc Exam Updates: Due To Coronavirus Only 3 Subjects Of 12th Standard Can Be Examined; News And Live Updates

सीबीएसई परीक्षेवर चर्चा:​​​​​​​बारावीची फक्त 3 विषयांची परीक्षा घेतली जाणे शक्य; संरक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीगट आज राज्यांशी चर्चा करणार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • कोरोनामुळे परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना दुसरी संधी मिळू शकेल

सीबीएसईच्या बारावी विज्ञान, वाणिज्य व कला शाखेच्या फक्त तीन मुख्य विषयांचीच परीक्षा घेतली जाऊ शकते. इतर विषयांसाठी विद्यार्थ्यांनी मुख्य विषयात मिळवलेल्या गुणांच्या आधारे गुण देण्याचे सूत्र स्वीकारले जाऊ शकते. बारावी बोर्ड परीक्षेबाबत निर्णयासाठी केंद्र सरकारने संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीगटाची स्थापना केली आहे. रविवारी सकाळी ११ वाजता होणाऱ्या व्हर्च्युअल बैठकीत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे शिक्षणमंत्री सहभागी हाेतील.

सूत्रांनुसार, मंडळाने दोन पर्याय सुचवले आहेत. एक असा की, विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर सामान्य पद्धतीने ३ तासांची परीक्षा देतील. मात्र असे केल्यास मंडळाला निकाल जाहीर करण्यासाठी कमीत कमी तीन महिने लागतील. दुसरा असा की, परीक्षा दीड तासाची असावी व परीक्षार्थी ज्या शाळेत शिकतो तेथेच परीक्षा घ्यावी. प्रश्नपत्रिकेत फक्त ऑब्जेक्टिव्ह पद्धतीचे व लघुत्तरी प्रश्न असावेत. ज्या विद्यार्थ्यांना कोरोनामुळे परीक्षा देता येणार नाही त्यांना दुसरी संधी देण्याबाबतही निर्णय होऊ शकतो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सीबीएसई व आयसीएसईने बारावीची परीक्षा स्थगित केली आहे. मंत्रीगटात केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, स्मृती इराणी यांचा समावेश आहे.

नीट, जेईईवरही होईल चर्चा
राज्यांत बारावीच्या परीक्षेसोबतच नॅशनल टेस्टिंग एजन्सी व इतर राष्ट्रीय संस्थांनी नीट, जेईईसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षाही स्थगित केल्या होत्या. मंत्रीगटाच्या बैठकीत यावर चर्चा होईल. पोखरियाल यांनी शनिवारी ट्विट केले, की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांशी संबंधित निर्णय राज्य सरकारे व तज्ञांच्या सल्ल्यानंतर घेण्यास सांगितले आहे. शिक्षणमंत्र्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक व शिक्षणतज्ञांकडूनही काही सूचना मागवल्या आहेत.

बहुतांश राज्यांना वाटते, परीक्षा व्हावी पण मुलांवर मानसिक ताण पडू नये

 • पंजाब स्कूल बोर्डाचे चेअरमन प्रो. योगराज म्हणाले, सीबीएसईने सांगितले तर आम्ही परीक्षा घेण्यास पूर्णपणे तयार आहोत.
 • हरियाणाचे शिक्षणमंत्री कंवरलाल गुर्जर म्हणाले, ऑनलाइन किंवा ऑफलाइन... परीक्षा होतीलच.
 • मप्रचे शिक्षण राज्यमंत्री इंदरसिंह परमार म्हणाले, पुढील शिक्षणाच्या दृष्टीने परीक्षा महत्त्वाच्या आहेत.
 • गुजरातचे शिक्षणमंत्री भूपेंद्र चुडासामा म्हणाले, परीक्षा व्हावी, मात्र, त्यासाठी कमी वेळ असावा. अभ्यासक्रम कमी असावा. पर्यायी प्रश्नांचा यात समावेश असावा.
 • छत्तीसगडचे शिक्षणमंत्री प्रेमसाय टेकाम म्हणाले, मुलांना जोखीम नको, पण परीक्षा आवश्यक आहे. यासाठी पर्याय शोधावे लागतील.​​​​​​​
 • उप्रचे उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा म्हणाले, कंेद्राच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू.
 • राजस्थानचे शिक्षण राज्यमंत्री गोविंद डोटासरा आणि हिमाचलचे शिक्षणमंत्री गोविंदसिंह ठाकूर म्हणाले, बैठकीत भूमिका मांडू.​​​​​​​
 • बिहारनुसार, अंतर्गत मूल्यांकनाने पुढील वर्गात प्रवेशाचा पर्याय आहे. झारखंडलाही या परीक्षा घेणे आवश्यक वाटते.

१२ वीत १७४ विषय, वीस महत्त्वाचे
सीबीएसई १२ वीचे १७४ विषय अाहेत, मात्र त्यात वीसच मुख्य विषय समजले जातात. यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, बिझनेस स्टडीज, लेखाशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र आणि इंग्रजी आहेत. सामान्यपणे विद्यार्थी कमीत कमी ५ विषय आणि एक अतिरिक्त विषयासह ६ विषय घेतात.

बारावीच्या परीक्षेबाबतचा कोणताही निर्णय वैद्यकीय, अभियांत्रिकीसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमासह पदवी व उच्च शिक्षणाच्या इतर अभ्यासक्रमांवर परिणाम करेल. यामुळेच बहुतांशी राज्य सरकारे परीक्षा घेण्याच्या बाजूने आहेत. मात्र, संसर्गापासून विद्यार्थ्यांना वाचवण्याचेही आव्हान आहे.

बातम्या आणखी आहेत...