आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • CBSE 10 AND 12 EXAM RESULT | But Students Scoring Above 90% And 95% Dropped... Because They Were Promoted During Covid Period

सीबीएसई निकाल:...मात्र 90% अन् 95% पेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी घटले..कारण त्यांना कोविडकाळात बढती मिळाली

नवी दिल्ली19 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • : १२वीत ८७%, १०वीत ९३% मुले उत्तीर्ण
 • मुलींची बाजी, गतवर्षीपेक्षा निकाल घटला, कोरोनाकाळापेक्षा वाढला

सीबीएसईने शुक्रवारी एकाच दिवशी १२वी आणि १०वीचे निकाल जाहीर केले. ८७.३३% मुले १२वी तर ९३.१२% मुले १०वी उत्तीर्ण झाली आहेत. दोन्ही वर्गांचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत घसरला आहे. २०२२ मध्ये ९२.७१% मुले १२वी मध्ये आणि ९४.४% मुले १०वी मध्ये उत्तीर्ण झाली. तथापि, चांगली बाब म्हणजे प्री-कोविडच्या तुलनेत दोन्ही निकालांमध्ये सुधारणा झाली आहे. २०१९ मध्ये १२वीचा निकाल ८३.४% आणि १०वीचा ९१.१% लागला. या वेळीही मुलींनी चांगली कामगिरी केली.

इयत्ता १२वीच्या मुलींनी सलग १०व्यांदा आणि १०वीच्या मुलींनी सलग सहाव्यांदा मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली. बारावीत मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा ६.०१% व दहावीत १.९८% जास्त आहे. सीबीएसईने सांगितले की, ‘कुणाला जास्त गुण’ या स्पर्धेला परावृत्त करण्यासाठी गुणवत्ता यादी आणि विभागणी जाहीर करण्यात आली नाही. सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या ०.१% विद्यार्थ्यांना मेरिट सर्टिफिकेट दिले जातील.

यंदा ९०-९५% पेक्षा अधिक गुण घेणाऱ्यांची संख्या घटली. बारावीत ६.८०% मुलांनी ९०% वर, १.३६% मुलांनी ९५% वर गुण मिळवले. दहावीत ९.०४% जणांनी ९०% वर व २.०५% नी ९५% वर गुण मिळवले. वस्तुत: कोविडमध्ये दहावीतून बढती मिळालेल्या मुलांनी यंदा बारावीची परीक्षा दिली. ही त्यांची पहिली बोर्ड परीक्षा होती. त्याचा अनुभव नसल्याने कामगिरीवर परिणाम झाला. ज्यांनी यंदा दहावीची परीक्षा दिली तेही २०२१ मध्ये आठवीतून प्रमोट झाले होते. म्हणून त्यांची कामगिरी ढासळली. कोविडमध्ये वाचन-लिखाणाची सवय मोडली. यात ते सुधारणा करू शकले नाही.

१०वी-१२वीत ९०% पेक्षा जास्त गुण घेणारे ५ वर्षांत सर्वात कमी

बारावी ९० टक्के ९५ टक्के २०१९ - ७.८२ १.४६ २०२० - १३.२४ ३.२४ २०२१ - ११.५१ ५.३७ २०२२ - ९.३९ २.३३ २०२३ - ६.८० १.३६

पुढच्या वर्षी १५ फेब्रुवारीपासून परीक्षा
सीबीएसईने सांगितले, यंदा विद्यार्थी १०वीत दोन, १२वीत एका विषयात सप्लिमेंटरी देऊ शकतील. या परीक्षा जुलैमध्ये होतील. तारीख नंतर जाहीर केली जाईल. पुढच्या वर्षी १०वी-१२वीच्या बोर्ड परीक्षा १५ फेब्रुवारी, २०२४ पासून सुरू होतील.

१०वी-१२वीत कंपार्टमेंटवाले वाढले
वर्ष २०२२ २०२३
दहावी १,०७,६८९ १,३४,७७४
बारावी ६७,७४३ १,२५,७०५

गेल्या तीन वर्षांतील कल
वर्ष 10वी उत्तीर्ण 12वी उत्तीर्ण
2019 91.10% 83.40%
2022 94.40% 92.71%
2023 93.12% 87.33%

तुमच्याकडे आगामी काळात करण्यासाठी खूप काही आहे
ज्यांना वाटते की बारावीत अजून चांगली कामगिरी करता आली असती अशा होतकरू तरुणांना मी सांगू इच्छित आहे की, तुमच्याकडे आगामी काळात करण्यासाठी खूप काही आहे. परीक्षांचा संच तुम्हाला परिभाषित करत नाही. ज्यात आवड आहे त्याच क्षेत्रात गुणवत्तेचा वापर करा. तुम्ही अवश्य मोठे यश मिळवू शकता!' - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

दहावी ९० टक्के ९५ टक्के

 • २०१९ १२.७८ ३.२५
 • २०२० ९.८४ २.२३
 • २०२१ ९.५८ २.७६
 • २०२२ ११.३२ ३.१०
 • २०२३ ९.०४ २.०५

राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० मधील शिफारशीी लक्षात घेता कंपार्टमेंट परीक्षेला आता सप्लिमेंटरी एक्झाम म्हटले जाईल. - डॉ. संजय पाराशर, शिक्षणतज्ज्ञ

(शब्दांकन : दीपक आनंद)