आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • CBSE 10th 12th Exam 2020 Updates | Central Board Secondary Education Remaining Class 10 And 12 Board Exams From July 1 To 15

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीबीएसई:10वी-12वी बोर्डाच्या परीक्षा 1 ते 15 जुलैदरम्यान; लॉकडाउनमुळे आता 83 नाही, तर फक्त 29 विषयांची परीक्षा होणार

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुढील वर्गात जाण्यासाठी महत्वाच्या असलेल्या विषयांच्याच परीक्षा घेतल्या जातील

लॉकडाउनमुळे टाळण्यात आलेल्या सीबीएसईच्या 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर झाल्या आहेत. शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी शुक्रवारी ट्वीट करुन सांगितले की, या परीक्षा आता 1 ते 15 जुलैदरम्यान घेतल्या ताली. सीबीएसईने 83 विषयांची परीक्षा न घेतला फक्त  29 विषयांच्या परीक्षा होतील, असे सांगितले आहे. 

आता सीबीएसईला मिळाले 15 दिवस

29 एप्रिलला सीबीएसई बोर्डाने म्हटले होते की, जर सरकारने 10 ते 12 दिवसांचा वेळ दिला, तर बोर्ट 12 वीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षा घेईल. सीबीएसईच्या सचिवांनी सोशल डिस्टेंसिंगचे पालन करण्यासोबतच सरकारला उत्तर पत्रिकांच्या मुल्यांकनाची परवानगी मागितली होती.

तीन दिवसांपूर्वीच सीबीएसईच्या 10वी बोर्ड परीक्षेबाबत स्थिती स्पष्ट करण्यात आली होती. उत्तर-पूर्व दिल्लीच्या विद्यार्थ्यांना सोडून देशात एकाही 10वीच्या विद्यार्थ्याची परीक्षा बाकी नाही. शिक्षण मंत्री म्हमाले की, सर्व राज्यांमध्ये 10वी बोर्ड परीक्षा झाल्या आहेत. उत्तर-पूर्वी दिल्लीमधील 10वीच्या उर्वरित 6 विषयांच्या परीक्षा लवकर घेतल्या जातील.

जेईई मेन आणि नीटच्या तारखा घोषित

जेईई मेन आणि नीटच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. नवीन शेड्यूलनुसार, आता जेईई मेन 18 ते 23 जुलै दरम्यान होईल. तर, 26 जुलैला नीटची परीक्षा होईल. जेईई अॅडवांस्ड परीक्षा 23 ऑगस्टला होईल.

बातम्या आणखी आहेत...