आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • CBSE 10th 12th Exams Datesheet Released: CBSE 10th 12th Exam 2020 News Updates |

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तारखा जाहीर:सीबीएसई 10-12 वी बोर्ड परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर, 1 ते 15 जुलै दरम्यान होणार 29 विषयांच्या परीक्षा

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हेल्थ गाइडलाइनचे पालन करावे लागणार, विद्यार्थ्यांना मास्कसह सॅनिटायझर अनिवार्य

सीबीएसईने सोमवारी १०वी आणि १२ वीच्या उर्वरित परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सर्व परीक्षा फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांसह १ जुलै ते १५ जुलै या काळात होतील. बोर्डाने सर्व परीक्षांची वेळ सकाळी १०.३० ते १.३० अशी निश्चित केली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी टि्वटद्वारे ही माहिती दिली. लाॅकडाऊनमुळे २५ मार्चपासून या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सीबीएसईने म्हटले होते की, पदवीच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या १२ वीच्या फक्त २९ विषयांच्याच परीक्षा होतील. १२ वीच्या परीक्षा देशभरातील विद्यार्थ्यांच्या तर १० वीची परीक्षा फक्त ईशान्य दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या होतील. सीएएविरोधातील दंगलीमुळे येथील परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या.

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी टि्वट करत म्हटले की, प्रिय विद्यार्थी मित्रांनो मी १० वीच्या उर्वरित परीक्षांच्या तारखा देत आहे. या परीक्षा ईशान्य दिल्लीतच होतील. अन्य एका टि्वटद्वारे त्यांनी १२ वीच्या उर्वरित विषयांच्या तारखा जाहीर केल्या.

१० वी, १२ वी परीक्षांच्या तारखा :

१० वीची परीक्षा १ जुलैला सोशल सायन्स विषयासह सुरू होईल. नंतरच्या दिवशी सायन्सचा पेपर होईल. भारद्वाज यांनी सांगितले की १० जुलै रोजी हिंदी आणि १५ जुलैला इंग्रजीच्या दोन्ही कोर्सची परीक्षा होईल. संपूर्ण देशात १२ वी सोशल सायन्सचा पेपर एक जुलै रोजी होईल. नंतरच्या दिवशी हिंदीचे दोन्ही कोर्सचे पेपर राहतील. १२ वी बिझनेस स्टडीजची परीक्षा ९ जुलै रोजी, १० जुलैला बायोटेक्नॉलॉजी, ११ जुलैला जिओग्राफी(भूगोल) आणि १३ जुलै रोजी सोशलॉजीचे पेपर होतील.

गाइडलाइनचे पालन करावे लागेल

परीक्षांवेळी कोरोना हेल्थ गाइडलाइनची माहिती देताना सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी सांगितले की,सर्व विद्यार्थ्यांना सोबत सॅनिटायझर आणावे लागेल. मास्क अनिवार्य राहील. आपला मुलगा आजारी नसल्याची खात्री पालकांनी करावी. तसेच फिजिकल डिस्टन्सिंगसाठीचे सुरक्षित अंतर सर्वांना पाळावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...