आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:सीबीएसईच्या दहावी, बारावी प्रथम सत्राच्या परीक्षा होणार ऑफलाइन

नवी दिल्ली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीबीएसईच्या दहावी व बारावीची २०२१-२२ शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्राच्या बोर्ड परीक्षेची डेटशीट १८ ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाईल. सर्व पेपर ऑफलाइन मोड म्हणजे शाळा परिसरात सकाळी १०.३० वाजेऐवजी ११.३० वाजेपासून सुरू होतील. ९० मिनिटांच्या पेपरमध्ये सर्वच प्रश्न ऑब्जेक्टिव्ह पद्धतीचे असतील. परीक्षार्थीला उत्तर लिहिण्यापूर्वी १५ मिनिटांऐवजी २० मिनिटे पेपर वाचण्यासाठी मिळतील. विद्यार्थी ओएमआर शीटवर योग्य पर्यायाच्या वर्तुळात रंग भरून आपले उत्तर देतील.

केवळ पेनने भरलेली वर्तुळेच ग्राह्य असतील. परीक्षा संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे गुणही दिले जातील. परंतु कोणत्याही विद्यार्थ्याला पास, कंपार्टमेंट किंवा इसेन्शियल रिपीट गटात टाकले जाणार नाही. विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल द्वितीय सत्राच्या परीक्षेनंतर जाहीर केला जाईल. दोन्ही सत्रांतील परीक्षेचे मूल्यमापन ५०-५० टक्के असेल. बोर्डाने सर्वच शाळांना निर्देश देऊन प्रॅक्टिकल, इंटर्नल अॅसेसमेंट आणि प्रोजेक्ट आदीचे काम पहिल्या सत्राची परीक्षा संपण्यापूर्वीच पूर्ण करण्यास सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...