आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • CBSE 10th Board Cancels| How Much Will Be The Danger Of Teachers' Favoriteism, On What Basis Can Students Select The Subject In The 11th

परीक्षा रद्द झाल्याचा विद्यार्थ्यांवर परिणाम:11 वीतील विषय निवडीचा आधार अद्याप ठरलाच नाही, विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या फेवरेटिज्मचा कितपत धोका ..?

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 11वीत स्ट्रीम कुठल्या आधारावर निवडणार ?

देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सरकारने CBSE च्या 10वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षा येत्या 4 मे पासून सुरू होणार होत्या. तर, 12वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यावर सरकार 1 जूनला निर्णय घेईल.

10 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर घेण्यात आला. बैठकीत पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्वाचे असल्याचे सांगितले. या परीक्षा रद्द झाल्यानंतर 11वीत स्ट्रीम कुठली निवडावी, मार्क कोणत्या आधारावर मिळतील, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात येत आहेत. जानकारांकडून जाणून घेऊया या प्रश्नांची उत्तरे...

11वीत स्ट्रीम कुठल्या आधारावर निवडणार ?

जानकार ध्रूव बॅनर्जी सांगतात की, देशातील अनेक शाळांमध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने परीक्षा झाल्या आहेत. 10वी झाल्यावर काही विद्यार्थी आपल्या आवडीनुसार, तर काही विद्यार्थी 10वीत मिळालेल्या गुणांच्या आधारावर 11वीत स्ट्रीम निवडतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आवडीसोबतच गुणदेखील महत्वाची आहेत.

विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या फेवरेटिज्मचा किती धोका ?

10वीच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा निकाल इंटरनल्सच्या आधारावर होईल. अद्याप याबाबत माहिती आलेली नाही. पण, जर विद्यार्थ्यांना इंटरनल्सच्या आधारावर मार्क दिले गेले, तर त्यांना शिक्षकांच्या फेवरेटिज्म (पक्षपात) चा परिणाम काही प्रमाणात पडू शकतो. पण, सर्व शिक्षक पक्षपात करतीलच असे नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्त घाबरून जाण्याचे कारण नाही.

इंटरनल एग्झाममध्ये नापास झालेला विद्यार्थ्याचे जनरल प्रमोशन होईल ?
सध्या 10वीच्या निकालाबाबत बोर्डाकडून कुठलीच माहिती देण्यात आलेली नाही. याबाबत बोर्डाच्या एग्झाम कंट्रोलर संयम भारद्वाज यांनी सांगितले की, निकालाचा क्रायटेरीया अद्याप ठरवण्यात आलेला नाही. त्यामुळे हा ठरवल्यानंतरच निकालाबाबत सांगता येईल.

बातम्या आणखी आहेत...