आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • CBSE 10th Result Declare | 91.46% Students Pass CBSE 10th; For The Third Year In A Row, The Girls Took The Lead

परीक्षा निकाल:सीबीएसई 10 वीत 91.46% विद्यार्थी उत्तीर्ण; सलग तिसऱ्या वर्षी मुलींनी घेतली आघाडी

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • यंदा मेरिट लिस्ट नाही; 1 लाख 84,358 विद्यार्थ्यांना 90% पेक्षा जास्त गुण

सीबीएसई बोर्डाचा १० वीचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ०.३६% चांगला निकाल लागला असून एकूण ९१.४६ % विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच सलग तिसऱ्या वर्षीही मुलींनी निकालात बाजी मारली. ९३.३१% मुली, तर ९०.१४% मुले उत्तीर्ण झाली. मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण मुलींचे प्रमाण ३.१७% अधिक आहे.

दरम्यान, कोरोना महामारीमुळे यंदा बोर्डाने मेरिट लिस्टशिवाय निकाल जाहीर केला. दरवर्षी सीबीएसई निकालात गुणवत्ता यादी जाहीर केली जाते. परंतु लॉकडाऊन आणि परीक्षांवर परिणाम पाहता या वेळी टॉपर्सच्या नावाची घोषणा केली नाही. विद्यार्थी सीबीएसईच्या वेबसाइटसह उमंग अॅप, एसएमएस आणि आयव्हीआरएसद्वारे निकाल पाहू शकतील. सीबीएसईच्या १६ विभागांमधून त्रिवेंद्रम विभागाने ९९.२८% निकालासह प्रथम क्रमांक मिळवला, तर गुवाहाटी विभागाचा निकाल सर्वात कमी ७९.१३% लागला. केंद्रीय विद्यालय ९९.२३% निकालासह प्रथम, तर जवाहर नवोदय ९८.६६ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी आहे. यावर्षी एकूण १ लाख ८४ हजार ३५८ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत, तर ४१ हजार ८०४ विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांहून जास्त गुण मिळाले. दोन्ही श्रेणींमध्ये ही आकडेवारी गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे. सीबीएसईशी संबंधित विदेशी शाळांमध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९८.६७% आहे. गतवर्षी हे प्रमाण ९८.७५% होते.

बोर्डाची वेबसाइट क्रॅश : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री निशंक यांनी ट्विटद्वारे बोर्डाने निकाल जाहीर केल्याची माहिती दिली. मात्र, निकाल लागल्याच्या अडीच तासांनंतर वेबसाइट अनेक वेळा क्रॅश झाली.

९८.०५ टक्के निकालासह पुणे विभाग चौथ्या क्रमांकावर

पुणे | बोर्डाच्या एकूण १६ विभागांत पुणे विभागाचा निकाल ९८.०५ टक्के लागला असून हा विभाग देशात चौथ्या स्थानी आहे. दहावी परीक्षेत गेल्या वर्षी ९१.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यंदाच्या निकालाची टक्केवारी किंचित वाढली आहे. यंदा ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ८४ हजार, ९५ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४१ हजार आहे.

बातम्या आणखी आहेत...