आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • CBSE 12th Assessment Scheme| Know How To Calculate 12th Results At Home On The Basis Of 30:30:40

CBSE 12 वी असेसमेंट स्कीम:3 वर्षांच्या कामगिरीवर ठरेल 12 वीचा निकाल; 31 जुलैपर्यंत होणार घोषणा, 30:30:40 च्या आधारे असे जाणून घ्या आपले मार्क्स

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • 31 जुलैपर्यंत जारी होऊ शकतो निकाल

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्यूकेशन (CBSE)ने गुरुवारी 12 वीचा निकाल तयार करण्यासाठी ठरवलेल्या फॉर्मूल्यावर सर्वोच्च न्यायालयाला आपला रिपोर्ट सोपवला. बोर्डाने ठरवलेल्या क्रायटेरियानुसार यावर्षी 12 वीचा निकाल 30:30:40 च्या फॉर्मूल्यावर ठवरला जाईल.

निकाल याप्रमाणे तयार होईल
मार्किंग स्कीम डिटेल्स देताना CBSE म्हणाले की, दहावी व अकरावीच्या 5 विषयांपैकी विद्यार्थ्यांनी ज्या तीन विषयांमध्ये सर्वाधिक गुण मिळवले आहेत त्यांचा निकाल तयारीसाठी निवडला जाईल. त्याचबरोबर, ते बारावीच्या युनिट, टर्म आणि प्रॅक्टिकल परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे तयार केले जाईल.

30:30:40 फॉर्म्युला काय आहे?
सीबीएसईने बनवलेल्या पॅनेलने इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यासाठी 30:30:40 फॉर्म्युला निश्चित केला आहे. त्याअंतर्गत दहावी-अकरावीच्या अंतिम निकालास 30 टक्के वेटेज दिले जातील तर 12 वीच्या पूर्व-बोर्ड परीक्षेला 40% वेटेज दिले जाईल. 4 जून रोजी सीबीएसईने 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्किंग स्कीम तयार करण्याचा निर्णय घेण्यासाठी 13 सदस्यांची समिती गठीत केली होती. या समितीला दहा दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

प्रत्येक कामाची डेडलाइन निश्चित

 • 23 जूनपर्यंत रिझल्ट कमिटी स्थापन.
 • 28 जूनपर्यंत सीबीएसई मागील परीक्षांचे गुण शाळांना पाठवेल.
 • 30 जूनपर्यंत रिझल्ट कमिटी मूल्यांकनाचा रोडमॅप तयार करेल.
 • 8 जुलैपर्यंत रिझल्ट पाठवण्यासाठी बोर्ड पोर्टल उपलब्ध करून देईल.
 • 15 जुलैपर्यंत शाळांना रिझल्ट अपलोड करावे लागतील.
 • 31 जुलैला रिझल्ट लागेल.

असा जाणून घ्या आपला निकाल
बोर्डाकरुन असेसमेंट क्रायटेरिया ठरवल्यानंतरपासून विद्यार्थी संभ्रमात आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थी त्यांच्या मार्कांचा अंदाज मंडळाच्या निर्धारित सूत्रानुसार स्वतःच काढू शकतात-

उदाहरणार्थ :-

क्लासनंबर (500 मधून)
10वी285 (तीन विषयांचे 95-95)
11वी470 (फायनल एग्जाम)
12वी450 (प्री-बोर्ड)

आता 285 गुणांच्या 30%, 470 गुणांच्या 30% आणि 450 गुणांच्या 40% काढून आपले रिजल्ट स्वतः माहिती करुन घेऊ शकता. वरील अनुमानित गुणांच्या आधारे दहावीसाठी 85.5 गुण, 11 वीचे 141 आणि 12 वी पूर्व-बोर्डातील 180 गुण जोडले जातील. अशा प्रकारे विद्यार्थ्याला 500 पैकी एकूण 406.5 गुण मिळतील.

यानुसार त्याच्या 12 वीमध्ये 81% गुण येऊ शकता. विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे की, हा फक्त अंदाज आहे, निकाल असेच येतील असे आवश्यक नाही.

31 जुलैपर्यंत जारी होऊ शकतो निकाल
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान बोर्डाने हे देखील सांगितले की, ठरवलेल्या क्रायटेरियाच्या आधारे जारी निकालाने असंतुष्ट विद्यार्थ्यांना जर परीक्षा द्यायची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी नंतर वेगळी व्यवस्था केली जाईल. बोर्डाने हे देखील म्हटले आहे की, जर सर्व काही योग्य राहिले तर 31 जुलैपर्यंत रिजल्ट जारी केले जातील.

यंदा पास पर्सेंटेज जास्त असेल, त्यामुळे कॉलेजात ५-१०% जागा वाढवाव्यात

१२ वीत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीत थिअरीचे ७० गुण, प्रॅक्टिकल/इंटर्नल असेसमेंटचे ३० गुण आहेत. निकाल तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांचे १० वी, ११ वीत फायनल एक्झामचे गुण, १२ वीच्या मिड टर्म/युनिट टेस्ट/प्री-बोर्डाच गुण समाविष्ट केले जातील. निकाल ३०:३०:४० च्या फॉर्म्युल्यावर तयार केला जाईल. यंदा पास पर्सेंटेज जास्त असेल, त्यामुळे कॉलेजात ५-१०% जागा वाढवाव्यात

शाळेत रिझल्ट कोण तयार करेल?
प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल. २ ज्येष्ठ शिक्षक शाळेचे व २ जवळच्या शाळेचेही असतील. मूल्यांकनादरम्यान विषय शिक्षक समितीत असतील.

शाळा मनाप्रमाणे गुण देऊ शकतील का?
नाही. शाळेच्या गेल्या तीन वर्षांच्या बोर्ड रिझल्टपैकी सर्वात चांगला निकाल असलेले रेफरन्स वर्ष असेल. रेफरन्स वर्षांत एखाद्या विद्यार्थ्याला मॅथ्समध्ये कमाल ९० गुण मिळाले असतील तर यंदा मॅथ्समध्ये ८५ किंवा ९५ (+/-५) गुण होऊ शकतात. संपूर्ण शाळेचा रिझल्टही रेफरन्स वर्षाच्या आधारावरच राहील.

जर एखाद्या शाळेचा दोन वर्षांचा डेटा असेल तर?
मग शाळांना त्यापैकी बेस्ट निवडावा लागेल.

जर कोणी या फॉर्म्युल्याने नापास झाला तर?
अशा विद्यार्थ्यांना ‘इसेन्शल रिपीट’ किंवा ‘कम्पार्टमेंट’ श्रेणीत ठेवले जाईल. ते परीक्षा देऊ शकतील.

एखादा विद्यार्थी मूल्यांकनामुळे असमाधानी असेल तर?
परीक्षा होईल, तीत मिळवलेले गुण अंतिम असतील.

५ पेक्षा जास्त विषय असल्यास मूल्यांकन कसे होईल?
ज्या ३ विषयांत जास्त गुण, तेच मोजले जातील. एखाद्या विषयाचा पूर्णांक ८० पेक्षा जास्त असेल तर त्याच्या गुणांची गणना ८० पूर्णांकाच्या प्रमाणात होईल.

एखाद्याने १२ वीत विषय बदलला असेल तर?
सीबीएसईच्या परवानगीने विषय बदलला असेल तर मूल्यांकन ३ विषयांच्या गुणांच्या आधारे होईल.

पोर्टलवर डेटा अपलोड झाल्यावर बदल होऊ शकेल?
नाही. दुरुस्ती किंवा बदल होऊ शकणार नाही.

असेसमेंटमध्ये सहभागी होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांचे काय?
रिझल्ट समिती त्यासाठी तोंडी परीक्षा घेईल. तसेच मूल्यांकनाची तार्किक पद्धतही काढेल.

१२ वीत चांगली कामगिरी करावी यासाठी अनेक शाळा ११ वीत टफ मार्किंग करतात. त्या मुलांचे काय?
बोर्डाकडे मर्यादित पर्याय होते. त्या पर्यायांत हा बेस्ट फॉर्म्युला आहे. शाळा +/-५ गुण करू शकतील. {अनेक विद्यार्थी या फॉर्म्युल्यामुळे समाधानी असणार नाहीत. १२ वीत परीक्षा देणाऱ्यांची संख्या जास्त राहील ?
१२ वीनंतर उच्च शिक्षणासाठी एखाद्या विशिष्ट कॉलेजमध्ये प्रवेशासाठी १-१ गुण महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे परीक्षा देणाऱ्यांची संख्या जास्त राहील.

कॉलेजमध्ये स्पर्धा असेल. काय परिस्थिती राहील?
१२ वीत कोणी नापास होणार नाही. त्यामुळे कॉलेज प्रवेश परीक्षा घेतीलच. ८५% विद्यार्थी पास होऊन उच्च शिक्षणासाठी जातात, यंदा असे १५% जास्त असतील. उच्च शिक्षणात ५ ते १०% जागा वाढवाव्यात.
उदा.: थिअरीत १० वीत ७० पैकी ६६ गुण होते. ३०% वेटेजच्या हिशेबाने एकूण २१ पैकी १९.५ गुण होतील. असेच पुढील इयत्तांचे गुण जोडले जातील. हे

बातम्या आणखी आहेत...