आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • CBSE : 12th Exam Prolonged, 10th Exam Canceled, Decision Due To Increasing Corona Infection

सीबीएसई:12 वीची परीक्षा लांबली, 10 वीची रद्द, वाढत्या कोरोना संसर्गामुळे निर्णय; दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनाद्वारे पुढच्या वर्गात बढती

नवी दिल्ली (अनिरुद्ध शर्मा )9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इयत्ता 12 वीच्या परीक्षेच्या नव्या वेळापत्रकासाठी 1 जूनला बैठक

देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांकडे पाहता केंद्र सरकारने सीबीएसईच्या (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ) इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द, तर बारावीची परीक्षा ३१ मेपर्यंत लांबणीवर टाकली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या बैठकीनंतर शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल म्हणाले, ‘१० वीच्या विद्यार्थ्यांचा बोर्डाद्वारे निश्चित निकषांआधारे अंतर्गत मूल्यांकन करून निकाल जारी केला जाईल. तसेच त्यांना पुढच्या वर्गात बढती दिली जाईल. काेरोनाची स्थिती निवळल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षाही देता येईल. १२ वीच्या परीक्षेचे नवीन वेळापत्रक १ जूनला कोरोनाची स्थिती पाहून दिले जाईल. परीक्षा सुरू होण्याआधी विद्यार्थ्यांना किमान १५ दिवसांचा वेळ दिला जाईल.’

  • सीआयएससीईने म्हटले की, आयसीएसई आणि आयएससी बोर्ड परीक्षेबाबत लवकरच निर्णय घेतील.
  • राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेशनेही राज्य बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत.

विद्यापीठाच्या परीक्षाही तूर्त लांबणीवर टाकल्या
आैरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीए, बीएस्सी व बीकॉम, अभियांत्रिकीसह सर्व पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा २ मेपर्यंत स्थगित केल्या अाहेत, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांची परीक्षाही २७ एप्रिलऐवजी ५ मेपासून सुरू होणार आहे. विद्यापीठातील बीए, बीएस्सी व बीकॉम प्रथम वर्षाची परीक्षा ७ एप्रिलपासून सुरू झाली होती. त्याअाधी द्वितीय व तृतीय वर्षांच्या परीक्षा १६ मार्चपासून, तर अभियांत्रिकीसह सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा ६ एप्रिलपासून सुरू झाल्या हाेत्या. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी अाॅनलाइन किंवा अाॅफलाइन परीक्षा देण्याची मुभा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात अाली हाेती. मात्र अाता राज्य सरकारने १४ एप्रिल रात्रीपासून राज्यभर अनेक निर्बंध लागू केले अाहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणारे पदवी, पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाचे उर्वरित सर्व पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय कुलगुरू डाॅ. प्रमाेद येवले यांनी घेतला अाहे. त्यानुसार १५ ते ३० एप्रिलदरम्यान होणारे सर्व पेपर तूर्त स्थगित करण्यात अाले अाहेत. पदवी अभ्यासक्रमाचे उर्वरित पेपर ३ मेपासून, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे पेपर ५ मेपासून सुरू हाेणार अाहेत. याबाबत सविस्तर वेळापत्रक विद्यापीठातर्फे जाहीर केले जाईल. मे महिन्यात हाेणारी परीक्षा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने द्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये, ही जीवनकौशल्य विकासाची सुवर्णसंधी
१०वीची परीक्षा रद्द होणे हे खूप विद्यार्थ्यांसाठी निराशाजनक असेल. मात्र आयुष्यात चढ-उतार येतच असतात हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. आयुष्य जगण्याचे कौशल्य असेच विकसित होईल. या विषम परिस्थितीत आयुष्याला धोका आहे. जगलो तरच परीक्षा देऊ शकू. चांगले गुण मिळून पुढच्या वर्गात जाण्यासाठी तुम्ही मेहनत करत होते. या गुणांमुळे मनासारखी शाखा मिळाली असती. पण आताही ती मिळेलच. तुम्ही एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जावे हाच या परीक्षेचा हाच उद्देश्य होता. तसेही नव्या शैक्षणिक धोरणात १० बोर्डाच्या परीक्षाच संपुष्टात आणण्याचे सूतोवाच केले जात आहे. पण आपली काही स्वप्ने-इच्छा असतात, ही देखील खरेच आहे. मात्र जीवनातील परिस्थिती कधी बदलेल हे कुणालाच ठावूक नसते.

खरे तर मुलांमध्ये जगण्याच्या कौशल्यांचा विकास होण्यासाठी हीच अत्यंत पूरक वेळ आहे. या वेळी आपल्याला सुरक्षित व जबाबदारीने वागणे शिकायचे आहे. जसे आपल्या घरात कुणी वयोवृद्ध व्यक्ती असेल तर त्यांची प्रकृती चांगली राहावी म्हणून आपण मन मारून घरात राहावे. जेणेकरून आपल्याला संसर्ग होऊन आपण घरात इतरांनाही संसर्ग होऊ नये.

या काळात मुलांना त्यांच्या मनातील गोष्टी सांगाव्यात म्हणून आई-वडिलांनी त्यांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. आई-वडिलांनी त्यांच्यावरील टेन्शन मुलांना देऊ नये.

जेईई मेनचीही परीक्षा लांबणीवर टाका : जेईई मेनची एप्रिल सेशनची परीक्षा २७ ते ३० एप्रिल व मे सेशनची परीक्षा २४ ते २८ मेपर्यंत होणार आहे. याही परीक्षा रद्द करण्याची मागणी होत आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने अद्याप या परीक्षा टाळण्याबाबत कोणतेही संकेत दिलेले नाहीत.

नीट पीजी परीक्षा स्थगित करण्याची मागणी : देशातील ६,१०२ सरकारी, खासगी, अभिमत व केंद्रीय विद्यापीठांत प्रवेशासाठी नीट पीजी १८ एप्रिलला होणार आहे. विद्यार्थ्यांनी ही परीक्षा स्थगित करण्याची मागणी केली आहे. मात्र एनबीईने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

असा लागू शकतो दहावीचा निकाल : नववीचे ऑफलाइन गुण, दहावीचे अॉनलाइन मूल्यांकन आणि प्रॅक्टिकलद्वारे काढला जाईल फॉर्म्युला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

मुलांवर परीक्षेचा खूप तणाव होता. यंदा १० वीच्या विद्यार्थ्यांना बढतीसाठी मूल्यांकन पद्धतीत ९वी व १० वीच्या ऑफलाइन व ऑनलाइन कामगिरीचा समावेश केला जाऊ शकतो. १०वीचे संपूर्ण वर्ष घरीच अभ्यासात गेले आहे. त्यामुळे या मुलांच्या ९ वीच्या गुणांतील काही टक्के घेतले जाऊ शकतात. तसेच १०वीच्या तिमाही व सहामाही ऑनलाइन परीक्षा झाल्या असतील. प्रॅक्टिकल, असाइनमेंट व प्रोजेक्टमधील त्यांचा कल आणि कामगिरीतील काही टक्के जोडून विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केले जाऊ शकते.

तथापि, २० व्या शतकातील मानसिकतेने आपण ज्या पद्धतीने परीक्षा घेत आहोत त्या २१ व्या शतकात चालणार नाहीत. आपला डोलारा आजही एक बोर्ड परीक्षा घेऊ व त्याच आधारे मूल्यांकन करू या वन शॉट टर्मिनल एक्झामवर आहे. त्यात बदलांची गरज आहे. गतवर्षी इंटरनॅशनल बॅकलॉरिएटसह प्रमुख आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थांनी वार्षिक बोर्ड परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यांकनावर विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठवले. सर्व प्रकारच्या शाळा व मंडळांत फॉर्मेटिव्ह असेसमेंटची (रचनात्मक मूल्यांकन) प्रभावी, एकसमान व्यवस्था लागू करण्यासाठी आपल्याकडे वर्षभर वेळ होता. रचनात्मक मूल्यांकनात मुलांचे समग्र व्यक्तिमत्त्व समोर येते. नव्या शिक्षण धोरणातही म्हटले आहे की, सतत मूल्यांकनाची व्यवस्था असावी, ज्यात मुलांचे केवळ ज्ञानच नव्हे तर कौशल्य व आकलनाचेही मूल्यांकन केले जावे. सत्राच्या अखेरीस बंद खोलीत बसवून ३ तासांत पेन-पेपरच्या परीक्षेऐवजी मल्टिपल टूल्सने मुलांना पारखणे, असा रचनात्मक मूल्यांकनाचा अर्थ होते. आता शाळांत मुलांच्या मूल्यांकनासाठी वर्षभर चालणाऱ्या सतत रचनात्मक मूल्यांकनालाही वार्षिक परीक्षेत जोडले जावे. म्हणजे कोविडसारखी अनिश्चितता उद्भवल्यास रचनात्मक मूल्यांकनाद्वारे मुलांना बढती देता येईल. भास्कर एक्स्पर्ट अशोक गांगुली, माजी अध्यक्ष, सीबीएसई भास्कर काउन्सेलर गीतांजली कुमार, मानसशास्त्रज्ञ

बातम्या आणखी आहेत...