आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • CBSE 12th Result | 88% Students Pass, 5% Better Result Than Last Year; The Pass Percentage Of Girls Is 92% Higher Than That Of Boys By 5.%

सीबीएसई बारावी निकाल:88.87% विद्यार्थी उत्तीर्ण, गतवर्षीपेक्षा 5.38% चांगला निकाल; मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 92.15%, मुलांपेक्षा 5.96% जास्त

नवी दिल्ली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 38 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले.
Advertisement
Advertisement

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. १५ फेब्रुवारी ते ३० फेब्रुवारीदरम्यान ११ लाख ९२,९६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी १० लाख ५९,०८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सरासरी ८८.७८% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. २०१९ च्या तुलनेत हे प्रमाण ५.३८% जास्त आहे. http://cbseresults.nic.in आणि http://results.gov.in वर निकाल बघता येईल. याशिवाय उमंग अॅपमध्येही निकाल बघता येईल.

दरम्यान, सलग सहाव्या वर्षी मुली निकालात आघाडीवर आहेत. यंदा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.१५%, मुलांचे ८६.१९% आहे. मुलांच्या तुलनेत मुली ५.९६% पुढे आहेत. गतवर्षी निकाल २ मे रोजी लागला होता. मात्र यंदा लॉकडाऊनमुळे २ महिने उशीर झाला. लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या स्थितीमुळे या वेळी मेरिट लिस्ट आणि टॉपर्स लिस्टही जाहीर झाली नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सीबीएसईने १ ते १५ जुलैदरम्यान होणाऱ्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यानंतर अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

डिजिटल असेल मार्कशीट

विद्यार्थ्यांना यंदा डिजिलॉकरद्वारे डिजिटल मार्कशीट मिळेल. digilocker.gov.in वरून डाऊनलोड करावे लागेल. विद्यार्थ्यांना बोर्डाने एसएमएसने माहिती पाठवली आहे. याद्वारे ते मार्कशीट डाऊनलोड करू शकतील.

मार्कशीटवर ‘नापास’चा शेरा नाही

परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर नापासचा शेरा नसेल. याऐवजी फेरपरीक्षेसाठी पात्र असा शेरा असेल. अनुत्तीर्ण झाल्याचा शेरा विद्यार्थ्याची कुठलीही कागदपत्रे आणि बोर्डाच्या वेबसाइटवरही नसेल.

> 1.57 लाखाहून जास्त विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले. > 38 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले. > 400 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव. त्याची घोषणा नंतर होईल.

Advertisement
0