आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सीबीएससीने सोमवारी 103 दिवसांनंतर 12 वीचा निकाल ऑनलाइन जाहीर केला. मात्र आपल्या अधिकृत वेबसाइट http://cbseresults.nic.in आणि http://results.gov.in क्रॅश झाल्यामुळे मंडळाला निकाल सर्व शाळांकडे पाठवावे लागले आहे. गेल्या कित्येक वर्षात प्रथमच असे घडत आहे की, निकालाची साइट क्रॅश झाल्यानंतर पुन्हा उघडत नाहीये. अशा परिस्थितीत बोर्ड स्कूल, डिलीलॉकर आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या त्याच्या नोंदणीकृत एसएमएस आणि ईमेलवर निकाल पाठवला जात आहे.
केंद्रीय मनुष्यबळ मंत्री निशंक यांनाही ट्विट करावे लागले
http://cbseresults.nic.in आणि http://results.gov.in या दोन्ही वेबसाइट क्रॅश झाल्यामुळे केंद्रीय मंत्री डॉ रमेश पोखरियाल निशंक यांना देखील ट्विट करून पुन्हा नव्या यंत्रणेबद्दल सांगावे लागले.
Results of Class XII have been sent to all the schools across the country on the IDs provided by @cbseindia29 to the schools. Students may ask their school administration.
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) July 13, 2020
साइट कधी आणि कशी क्रॅश झाली
बोर्डची वेबसाइट cbseresults.nic.in वर दुपारी 12.30 वाजता निकाल आल्यानंतर तासाभरातच ही साइट क्रॅश झाली. यानंतर ती थोडा वेळ सुरू झाली आणि पुन्हा बंद पडली. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत साइटवर Server Error in '/' Application एरर येत आहे.
बोर्डाकडून स्पष्टीकरण
साइट क्रॅश झाल्यानंतर बोर्डाने आपल्या वतीने स्पष्टीकरण देत म्हटले की, त्यांनी राष्ट्रीय माहिती केंद्राला साइटच्या तांत्रिक समस्येबद्दल कळवले आहे. दोन तासांत साइट सुरू होण्याची अपेक्षा आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी संपूर्ण निकाल शाळांना पाठविण्यात आला आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक विद्यार्थ्यास त्याच्या डिजी-लॉकरमध्येही निकाल पाठविण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या मोबाइल आणि ईमेलवर निकाल
बोर्डाने ट्विट करत सांगितले की, वेबसाइट सुरू नसल्यामुळे आम्ही सर्व विद्यार्थ्यांना आमच्याकडे नोंदणी केलेल्या मोबाइल नंबरवर एसएमएस आणि ईमेल द्वारे निकाल पाठवत आहोत. ज्या मुलांनी आपला ईमेल आणि मोबाइल नंबर दोन्हीही नोंदणी केली नसले अशांनी आपल्या शाळेत संपर्क साधून निकाल मिळवू शकतात.
शाळा त्यांच्या ईमेलवर निकाल पाहू शकतात
सीबीएसईने केलेल्या व्यवस्थेव्यतिरिक्त सर्व शाळांना संपूर्ण निकाल पाठविण्यात आले आहे. यावर्षी प्रत्येक सीबीएसई शाळेसाठी तयार केलेल्या अधिकृत ई-मेल आयडीवर आपल्या येथील पूर्ण निकाल पाहू शकतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.