आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • CBSE Board 2021 Class 10th Latest Update | Check Central Board Of Secondary Education Today At Cbse.nic.in; CBSE 10th Board 2021

CBSE दहावीचे निकाल:CBSE ने अधिकृत वेबसाइटवर जारी केले दहावीचे निकाल, 99.04% विद्यार्थी झाले पास; सलग दुसऱ्यांदा गुणवत्ता यादी नाहीच

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE) च्या दहावीचे निकाल मंगळवारी जारी करण्यात आले आहेत. बोर्डाने आपल्या वेबसाइटवर दुपारी 12 वाजता निकाल घोषित केले. यामध्ये तब्बल 99.04% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना आपले निकाल CBSE ची अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in वर निकाल पाहता येतील. यासोबतच, डिजीलॉकर आणि SMS च्या माध्यमातून सुद्धा निकाल पाहता येणार आहेत.

CBSE ने जारी केलेल्या आकडेवारीप्रमाणे, 57 हजार विद्यार्थ्यांना 95% पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. तर 2 लाख विद्यार्थ्यांनी 90 ते 95% स्कोअर केले आहे. दहावीच्या परीक्षांसाठी एकूण 21 लाख 13 हजार 767 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 20 लाख 97 हजार 128 विद्यार्थ्यांचे निकाल जारी करण्यात आले. तर 16 हजार 639 विद्यार्थ्यांचे निकाल अद्याप तयार नाहीत. त्यांचे निकाल जारी करण्यासाठी लवकरच तारीख जाहीर केली जाणार आहे.

वेबसाइटवरून असे पाहा निकाल
सर्वात आधी CBSE चे अधिकृत संकेतस्थळ cbseresults.nic.in ला भेट द्या
या ठिकाणी होम पेजवर 10 वी CBSE Results 2021 लिंकवर क्लिक करा
आता नवीन पेज ओपन झाल्यावर विद्यार्थ्यांनी लॉग इन करावे
लॉग इन केल्यानंतर आपला निकाल स्क्रीनवर दिसून येईल
रिझल्ट पाहिल्यानंतर त्याची प्रिंट सुद्धा काढता येईल

वर्षातील सर्वात चांगल्या सत्राचा मानले संदर्भ वर्ष
या वर्षी निकाल जारी करण्यासाठी शाळेच्या गेल्या 3 वर्षांतील सर्वात चांगल्या निकालांचा विचार करणय्ता आला आहे. त्यालाच संदर्भ वर्ष असे गृहित धरण्यात आले आहे. विषयनिहाय मार्क देण्यासाठी सुद्धा हाच आधार घेण्यात आला आहे. रेफरेंस ईयर (संदर्भ वर्ष) मध्ये सर्वच विद्यार्थ्यांना मिळालेल्या सरासरीचा विचार करून निकाल तयार करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना विषयनिहाय मार्क देताना त्यांच्या सरासरीपेक्षा 2 अंक कमी किंवा जास्त देण्याचा अधिकार शाळांकडे होता.

या सूत्राचा आधार घेत जोडले गेले 100 मार्क

20 गुण - इंटरनल एसेसमेंट

10 गुण - युनिट टेस्ट

30 गुण - मिडटर्म/ हाफ ईयरली टेस्ट

40 गुण - प्री-बोर्ड एक्झामिनेशन

यावेळी सुद्धा मेरिट लिस्ट नाही
कोरोना आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर 10 वीच्या परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे बोर्डाने अंतर्गत परीक्षांचा आधार घेत गुणपत्रिका तयार केल्या आहेत. त्यामुळे, या वर्षी सुद्धा विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट तयार करण्यात आलेली नाही. तर जे विद्यार्थी आपल्या निकालावर समाधानी नाहीत, त्यांना परिस्थिती सामान्य झाल्यानंतर प्रत्यक्ष परीक्षा देण्याची परवानगी दिली जाणार आहे.

उमंग App, SMS च्या माध्यमातूनही पाहता येईल निकाल
विद्यार्थ्यांना उमंग App आणि SMS च्या माध्यमातून आपला निकाल पाहता येणार आहे. यासाठी त्यांना हे App डाउनलोड करून त्या ठिकाणी दिलेले CBSE निवडून लॉग इन करावे लागेल.

यासोबत SMS च्या माध्यमातूनही निकाल पाहता येणार आहे. यासाठी CBSE10 < ROLLNUMBER > < ADMITCARDID > टाइप करून0 7738299899 या क्रमांकावर SMS पाठवावे लागेल.

डिजीलॉकरच्या माध्यमातून मिळणार गुणपत्रिका
या वर्षी विद्यार्थ्यांना आपले निकाल डिजीलॉकरच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने दिले जाणार आहेत. यासाठी digilocker.gov.in येथून डिजीलॉकरमध्ये लॉग इन करावे लागेल. विद्यार्थ्यांना याचे आयडी आणि इतर महत्वाच्या बाबी आधीच SMS करण्यात आल्या आहेत. येथून विद्यार्थ्यांना आपल्या गुणपत्रिका डाउनलोड करून घेता येतील.

बातम्या आणखी आहेत...