आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • CBSE Board Class 12 Exam Date 2021 | CBSE Board Exam Latest Update, NTA, NEET, JEE Main Entrance Exams, Exam Live Updates

CBSE 12वीच्या परीक्षा:केंद्राने परीक्षांसाठी राज्यांना दोन दिवसात प्रस्ताव मागवले, 1 जूनला पुन्हा बैठक होणार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तीन विषयांची परीक्षा घेण्यावर विचार

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्यूकेशनच्या 12 वीच्या परीक्षांच्या विषयावर रविवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत कोणताच निर्णय होऊ शकलेला नाही. बैठकीनंतर केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सोशल मीडियावर सांगितले की, सर्व राज्यांना 25 मेपर्यंत प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.

ते म्हणाले की मला विश्वास आहे की आम्ही लवकरच बारावीच्या परीक्षेबाबत निर्णय घेण्याच्या स्थितीत असू. शक्य तितक्या लवकर त्याबद्दल माहिती देऊ, यामुळे विद्यार्थी आणि पालकांची अनिश्चितता दूर होईल. त्यांनी पुनरुच्चार केला की विद्यार्थी आणि शिक्षकांचे सुरक्षा आणि भविष्य दोन्ही आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि प्रकाश जावडेकर यांच्याशिवाय राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे मंत्री व अधिकारी उपस्थित होते.

1 जूनला पुन्हा बैठक
शिक्षणमंत्री 1 जूनला CBSE सोबत पुन्हा बैठक करतील. सूत्रांनुसार, रविवारी बैठकीमध्ये CBSE ने परीक्षांसाठी दोन पर्याय ठेवले आहेत. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, 12 वीच्या परीक्षा होणार. याची तारीख आणि फॉर्मेट अद्याप ठरलेला नाही. 1 जूनला तारखांची घोषणा होऊ शकते. तसेच राज्यात 12 वीच्या परीक्षांचा निर्णय त्यांच्या बोर्डावर सोडण्यात आला आहे.

तीन विषयांची परीक्षा घेण्यावर विचार

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेदररम्यान सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्यूकेशन (CBSE) 12 वीतील प्रमुख विषय म्हणजेच मेजर सब्जेक्ट्सची परीक्षा घेण्याचा विचार करत आहे. 12 वीमध्ये सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्सच्या केवळ 3 मुख्य विषयांचीच परीक्षा घेण्यावर विचार सुरू आहे. इतर विषयांना प्रमुख विषयांमध्ये मिळालेल्या मार्कच्या आधारावर मार्किंगचा फॉर्मूलाही ठरवला जाऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...