आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • CBSE Board Exam News And Updates | Union Education Minister Said Exams Will Be Held Physically, Dates To Be Announced On 31 December

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अखेर परीक्षेचे वेळापत्र जाहीर:CBSE बोर्डाच्या परीक्षा 4 मे ते 10 जून दरम्यान होतील, तर 15 जुलैपर्यंत रिझल्ट जाहीर केला जाईल

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'विद्यार्थी आणि शिक्षकांनी डिजिटल लर्निंगसाठी स्वतःला तयार केले'

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एजुकेशन (CBSE) च्या 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा 4 मे ते 10 जूनदरम्यान होणार आहेत. तसेच, या परीक्षेचा रिझल्ट 15 जुलैपर्यंत लावण्यात येईल. यापूर्वी, 1 मार्चपासून प्रॅक्टिकल एक्जाम सुरू होतील. शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी आज(दि.31) विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हटले की, कोरोना काळात तुम्ही स्वतःला ज्याप्रकारे तयार केले, ते अतिशय कौतुकास्पद आहे. मी शिक्षक आणि पालकांचा आभारी आहे.

निशंक पुढे म्हणाले की, आम्ही मुलांचे वर्ष वाया जाऊ दिले नाही. सुरक्षेसह आम्ही परीक्षा घेतल्या आणि वर्षा वाया जाण्यापासून वाचवले. विद्यार्थ्यांनी ज्याप्रकारे आपले मानसिक आरोग्य टिकून ठेवले, ते अभिमानास्पद आहे. आपल्या देशात 33 कोटी विद्यार्थी आहेत. हा आकडा अमेरीकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.

विद्यार्थी आणि शिक्षकांनी डिजिटल लर्निंगसाठी स्वतःला तयार केले

निशंक पुढे म्हणाले की, कोविड-19 च्या संकटाचा आपल्या विद्यार्थी आणि इतर सर्वांनी मोठ्या धैर्याने सामना केला. शिक्षकांनी एखाद्या यौद्ध्याप्रमाणे या काळात काम केले. डिजिटल अभ्यास झाला. प्रत्येत विद्यार्थ्याने स्वतःला तयार केले. ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नाही, त्यांच्यासाठी रेडिओ आणि टीव्हीच्या माध्यमातून शिक्षण दिले.

माध्यमांसोबतच्या बातचीतदरम्यान निशंक म्हणाले की, परीक्षा गृह मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशांनुसार होतील. विद्यार्थ्यांची सुरक्षा, हीच आमची प्राथमिकता आहे.

बातम्या आणखी आहेत...