आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • CBSE Board Result 2020 Class 10th Live Update | Check Central Board Of Secondary Education Today At Cbse.nic.in

CBSE 10th निकाल जाहीर:मेरिट लिस्टविनाच जाहीर झाला 10 वी बोर्डाचा निकाल, चार पद्धतींनी पाहू शकता तुमचा रिजल्ट

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 15 फेब्रवारीला सुरू झालेली परिक्षा पहिले स्थिगत आणि नंतर रद्द करण्यात आली
  • यावर्षी 10 वीच्या परिक्षेत 18 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी बसले होते

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्यूकेशन (CBSE)दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यावेळी बोर्डाने मेरिट लिस्ट म्हणजे टॉपर्सविना निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर, cbseresults.nic.in वर निकाल पाहता येऊ शकतो. याशिवाय उमंग अॅप, एसएमएस व आयव्हीआरएसकडून निकाल पाहण्याची सोय बोर्डाने दिली आहे.

केंद्रीय मानव संसाधन मंत्री निशंक यांनी ट्विट करत दिली माहिती 

असेसमेंट स्किमच्या आधारावर जाहीर होणार रिजल्ट 

विद्यार्थ्यांना उत्तीर्ण झालेल्या विषयांमधील गुणांच्या आधारे उर्वरित विषयांचे मार्क्स दिले जातील. ज्या विषयांचे पेपर होऊ शकले नाहीत. जर तीन पेक्षा जास्त पेपर दिले असतील तर यामधीलच तीन बेस्ट परफॉर्मिंग सब्जेक्टच्या अॅव्हरेज मार्क्सच्या आधारावर त्या विषयांचे मार्क दिले जातील. असे विषयी ज्यांचे पेपर ते देऊ शकले नव्हते. जर तिनच विषयांची परिक्षा दिली असेल तर विद्यार्थ्यांना त्याच्या दोन बेस्ट परफॉर्मिंग सब्जेक्टच्या अॅव्हरेज मार्क्सच्या आधारावर उर्वरित पेपरचे मार्क्स दिले जातील.

1. वेबसाइटवर असा पाहा रिजल्ट 

  • सर्वात पहिले CBSE च्या ऑफिशियल साइट cbseresults.nic.in वर जा. 
  • येथे होम पेजवर 10 वी क्लासच्या CBSE रिजल्ट 2020 लिंकवर क्लिक करा. 
  • आता एक नवीन पेज ओपन केल्यानंतर उमेदवारांना लॉगइन करावे लागेल. 
  • लॉगइन करताच तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. रिजल्ट पाहिल्यानंतर हे डाऊनलोड करुन हार्ड कॉपी ठेवा. 

2. उमंग अॅपवर पाहा रिजल्ट 

उमंग अॅप अँड्रॉइड आणि iOS दोन्हीवर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना पहिले अॅप डाऊनलाड करावे लागेल. यानंतर ओपन करुन होम स्क्रीनवर दिसणाऱ्या मार्क शीट टॅबवर क्लिक करावे लागेल. रिजल्ट पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकावी लागेल. 

3. IVRS च्या माध्यमातूनही पाहू शकता निकाल 

ज्या विद्यार्थ्यांजवळ स्मार्टफोन उपलब्ध नाही. त्यांच्यासाठी CBSE ने इंटरेक्टिव वॉइस रिस्पांस सिस्टम   (IVRS) ची व्यवस्था केली आहे. दिल्लीच्या विद्यार्थ्यांसाठी 24300699 नंबर आहे. तर देशातील इतर मुलांना  011-24300699  वर कॉल करुन आपला निकाल जाणून घेता येईल. 

4. SMS वर असा जाणून घ्या निकाल 

विद्यार्थ्यांसाठी रिजर्ट SMS च्या माध्यमातूनही पाहता येऊ शकतो.  यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या रिजिस्टर्ड मोबाइल नंबरवरुन 7738299899 वर एसएमएस पाठवावा लागेल. स्पेस < रोल नंबर> स्पेस < एडमिट कार्ड आयडी > लिहून पाठवावा लागेल. 

2020 च्या परीक्षेत बसलेले विद्यार्थी

रजिस्टर्ड  मुली   मुलं  ट्रान्सजेंडर्स विदेशी 

18 लाख 89 हजार 878

7 लाख 88 हजार 195 11  लाख 01 हजार 664 16

23 हजार 844