आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • CBSE Board Result 2021 Class 10th 12th Live Update | Check Central Board Of Secondary Education Today At Cbse.nic.in; CBSE 10th 12th Board Result 2021 Latest Updates

CBSE बारावीचा निकाल:बारावी सीबीएसई बोर्डाचा निकाल रेकॉर्ड ब्रेक, 99.37% विद्यार्थी झाले पास; असे मिळवा पासिंग आणि मायग्रेशन सर्टिफिकेट

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निकाल असा तयार करण्यात आला?

CBSE अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एजुकेशनने शुक्रवारी बारावीचा निकाल जारी केला आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in च्या माध्यमातून आपले निकाल पाहता येतील. पास होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत यावर्षी रेकॉर्ड मोडले आहेत. यंदा तब्बल 99.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा 0.54% ने का असेना, मुलींनीच बाजी मारली आहे.

असे तयार करण्यात आले निकाल
बोर्डाने यावेळी बारावीचे निकाल जारी करण्यासाठी 30:30:40 या सूत्राचा वापर केला आहे. या मार्किंग स्कीमनुसार, दहावी आणि अकरावीतील 5 विषयांपैकी 3 विषयांमधध्ये जे सर्वाधिक स्कोअरिंग असतील त्यांची निवड केली जाईल. तसेच बारावीला घेण्यात आलेल्या युनिट टेस्ट आणि प्रॅक्टिकलसह प्रथम सत्राच्या परीक्षांचा विचार करून निकाल तयार करण्यात आला आहे.

काय आहे 30:30:40 फॉर्मूला?
CBSE ने 4 जून रोजी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालांसाठी स्कीम तयार करण्याकरिता 13 सदस्यांची समिती नेमली होती. त्यांनीच या मार्किंग पद्धतीची शिफारस केली होती. यात बारावीचे निकाल लावण्यासाठी दहावीतील 30 टक्के, अकराव्या वर्गातील एकूण मार्कांचा 30 टक्के आणि त्यानंतर बारावीला अंतर्गत, प्रथम सत्र आणि प्रॅक्टिकलमध्ये मिळालेल्या मार्कांचा 40 टक्के असा 30:30:40 हा फॉर्मुला तयार करण्यात आला. त्यानुसारच बारावीचे हे निकाल जारी करण्यात आले आहेत.

असे चेक करा तुमचे निकाल
सर्वात आधी CBSE ची अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in वर भेट द्या.
या ठिकाणी होम पेजवर 12th CBSE Results 2021 लिंकर क्लिक करा.
आता नवीन पेज ओपन झाल्यावर उमेदवारांनी लॉग इन करावे.
लॉगिन करताच तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
रिझल्ट पाहिल्यानंतर त्याची सॉफ्ट कॉपी आणि प्रिंट काढून हार्ड कॉपी घेता येईल.

बोर्डाने लाँच केले रोल नंबर फाइंडर
रिझल्ट जारी करण्यापूर्वी बोर्डाने रोल नंबर फाइंडर लाँच केले आहे. ही लिंक ऑफिशियल वेबसाइट cbse.gov.in वर सक्रीय आहे. या ठिकाणी उमेदवार आपले रोल नंबर पाहू शकतील. 10 वीच्या विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर माहिती करून घेण्यासाठी आई-वडिलांचे नाव आणि जन्म तारीख टाकावी लागेल.

असे मिळवा रोल नंबर
सर्वात आधी रोल नंबर फाइंडर 2021 या लिंकवर क्लिक करा
आता बारावी हा वर्ग निवडा
नवीन विंडो उघडल्यानंतर त्यात आपली माहिती भरा
आपले रोल नंबर यानंतर दिसेल

डिजीलॉकरच्या माध्यमातून मिळणार मार्कशीट
विद्यार्थ्यांना या वर्षी देखील डिजीलॉकरच्या माध्यमातून मार्कशीट दिले जाणार आहेत. डिजीलॉकरने मार्कशीट मिळवण्यासाठी ते digilocker.gov.in येथून डाउनलोड करावे लागेल. बोर्डाकडून डिजीलॉकर क्रेडिट्स विद्यार्थ्यांना मेसेज करण्यात आले आहेत. याचा वापर कपून तुम्हाला आपल्या मार्कशीट, पासिंग सर्टिफिकेट आणि मायग्रेशन सर्टिफिकेट डाउनलोड करता येतील. डिजीलॉकर मोबाइल अॅप सुद्धा उपलब्ध आहेत.

बातम्या आणखी आहेत...