आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांनो ऐका!:CBSE 12 वी बोर्डाचा निकाल जारी; 87.33% टक्के विद्यार्थी पास; स्पर्धा टाळण्यासाठी यंदा गुणवत्ता यादी नाही

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

CBSE ने शुक्रवारी 12 वीचा निकाल जाहीर केला. त्यात 87.33 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्रिवेंद्रम झोनने 99.91% सह सर्वोत्तम कामगिरी केली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेत 6% जास्त आहे. यंदा 90.68% मुली व 84.67% मुले उत्तीर्ण झाली आहेत.

CBSE चे 3 मोठे निर्णय

  • यंदा निकालासोबत विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय डिव्हिजनची माहिती दिली जाणार नाही.
  • गुणवत्ता यादीही जारी केली जाणार नाही.
  • सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या 0.1% विद्यार्थ्यांना क्वालिफिकेशन सर्टिफिकेट दिले जाईल.

कारण - विद्यार्थ्यांमधील अनावश्यक स्पर्धेला आळा घालणे.

विद्यार्थ्यांना 16 मेपासून निकालाची छायाप्रत व पुनर्मूल्यांकन करता येईल. बोर्डाने 2024 च्या परीक्षांची तारीखही जाहीर केली आहे. या परीक्षा 15 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होतील.

गतवर्षीच्या तुलनेत 5% कमी रिझल्ट

वर्षरजिस्टर्डपरीक्षेला बसलेले विद्यार्थीपास विद्यार्थीटक्केटक्क्यांतील फरक
202214443411435366133066292.71%-5.38%
202316802561660511145017487.33%

​​​​​​​असा पाहा रिझल्ट

​​​​​​​CBSE 10वी-12वीचे निकाल अधिकृत वेबसाइट https://www.cbse.gov.in/ वर पाहता येतील. येथे विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येईल व डाउनलोडही करता येईल. याशिवाय तुम्ही तुमच्या मोबाईलवर भारत सरकारचे उमंग अॅप डाउनलोड करूनही निकाल पाहू शकता.

SMSद्वारे असा चेक करा रिझल्ट

  • फोनच्या मेसेज बॉक्समध्ये जा.
  • Text Message वर जाऊन CBSE 12 वी टाइप करा. त्यानंतर स्पेस न देता रोल नंबर प्रविष्ट करा.
  • त्यानंतर 77388299899 वर पाठवा.
  • रिप्लायमध्ये रिझल्ट येईल.

स्कोअर कार्ड तपासण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • रोल नंबर
  • स्कूल नंबर
  • जन्मतारीख
  • प्रवेशपत्र ओळखपत्र.

निकाल तपासण्यासाठी या प्रक्रियेचे अनुसरण करा

  • CBSE ची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in, cbseresults.nic.in वर जा.
  • वेबसाइटच्या होमपेजवरील CBSE 12वी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  • स्क्रीनवर लॉग इन विंडो दिसेल.
  • CBSE 12वी चा रोल नंबर टाका.
  • स्कोअरकार्ड स्क्रीनवर दिसेल.
  • पुढील गरजांसाठी CBSE निकाल डाउनलोड करा.

3883710 विद्यार्थ्यांनी दिली होती CBSE परीक्षा

CBSE 10वीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21 मार्च, तर 12वीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 5 मार्चपर्यंत आयोजित करण्यात आली होती. दोन्ही परीक्षांत 3883710 विद्यार्थी बसले होते. त्यात 10वीच्या 2186940 व 12वीच्या 696770 विद्यार्थी व विद्यार्थिनींनी परीक्षा दिली होती.

येथे पाहा कोणत्या क्षेत्रात किती टक्के विद्यार्थी पास झालेत...