आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • CBSE Class 12 Board Exam 2021 Date Proposal Update | CBSE Board Exams For Class XIIth To Be Held From 24th July To August 15; News And Live Updates

CBSE 12 वी परीक्षा:24 जुलै ते 15 ऑगस्टदरम्यान होण्याची शक्यता; 3 प्रस्तावांवर पीएमओकडून ग्रीन सिग्नलची प्रतिक्षा

नवी दिल्ली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) 12 वीच्या परीक्षावर सुप्रीम कोर्ट गुरवारी 3 जून रोजी सुनावणी करणार आहे. केंद्र सरकारनेही या निर्णयासाठी दोन दिवसांचा अवधी मागतिला आहे. परंतु, या परीक्षा आयोजित करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने एक प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे या प्रस्तावांवर पीएमओ कार्यालयाकडून फक्त ग्रीन सिग्नल मिळण्याची प्रतिक्षा आहे.

मंत्रालयाच्या सूत्रांनी भास्करला सांगितले की, ही परीक्षा 24 जुलै ते 15 ऑगस्टदरम्यान आयोजित करण्याची शक्यता आहे. परंतु, यावरदेखील सर्व राज्यांशी सल्लामसलत केला जाणार असल्याचे ते म्हणाले. कारण यासाठी जरी तीन प्रस्ताव तयार केले असले तरी हा अंतिम निर्णय नसून यासाठी इतरही मार्गाचा अवलंब केला जाऊ शकतो. परंतु, हे सर्व काही पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून असल्याचे सुत्रांनी सांगितले.

आज होऊ शकतो निर्णय
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयल निशंक यांचे 1 जूनला सीबीएसईसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कारण यापूर्वीच्या बैठकीत सीबीएसईने बोर्डाच्या परीक्षेसाठी 2 पर्याय ठेवले होते.

काही माध्यमांच्या वृत्तानुसार, 12 वीची परीक्षा घेण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. परंतु, परीक्षेसंदर्भांतील तारखा आणि स्वरूप अद्याप निश्चित केलेले नाही. तर काही राज्यांत 12 वीची परीक्षा घेण्याचा निर्णयही त्यांच्या बोर्डावर सोडण्यात आला आहे.

शिक्षण मंत्रालयाने तयार केले 3 प्रस्ताव

1. पहिला प्रस्ताव : बारावी विज्ञान, वाणिज्य व कला विभागातील मुख्य तीन विषयांची परीक्षा घेतल्यानंतर उर्वरित विषयाचे गुण हे मुख्य विषयांत मिळविलेल्या गुणांच्या आधार दिले जाऊ शकते.

2. दुसरे प्रस्ताव : ही परीक्षा अर्ध्या तासाची होणार असून यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जाणार आहे. या परीक्षेत विषयांची संख्याही मर्यादीत असेल. परंतु याबाबतीत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.

3. तिसरा प्रस्ताव : जर कोरोना महामारीमुळे देशातील परिस्थिती सुधारली नाही तर 9वी, 10वी, 11वी अशा तिन्ही वर्गाचे अंर्तगत मूल्यांकन केले जाऊ शकते व त्या आधारावर 12 वीचा निकाल जाहीर केला जाईल. परंतु, या प्रस्तावावर अद्याप कोणतेच स्पष्टीकरण दिले गेले नाही.

CBSE आणि ICSE बोर्डामध्ये काय फरक आहे?
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) हे एक सरकारी बोर्ड असून यावर केंद्र सरकारचे नियंत्रण आहे. तसेच आयसीएसई (ICSE) हे खाजगी शिक्षण मंडळ असून याला अँग्लो इंडियन लोकांच्या शिक्षणाच्या उद्दीष्टाने स्थापन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...