आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • CBSE Class 12 Result 2021 Update; Teachers Point Flaws In CBSE Class 10 Pattern Say Cant Be Applied To Class 12

आता 12 वीच्या निकालांवर मंथन:अंतर्गत परीक्षांमध्ये नापास होणारे विद्यार्थीही बोर्डात चांगले गुण मिळवतात! CBSE च्या 10 वीच्या निकालांमध्ये तज्ज्ञांनी दाखवल्या त्रुटी

17 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • 12 वीच्या परीक्षांना हाच नियम लागू केल्यास विद्यार्थ्याचे मोठे नुकसान होईल

कोरोना आणि लॉकडाउनच्या परिस्थितीत CBSE च्या परीक्षा रद्द केल्यानंतर त्याचे निकाल कशा पद्धतीने लागणार यावर आता मंथन सुरू आहे. रिझल्टचा जो पॅटर्न 10 च्या निकालांना लागू केला त्यातच आता शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी त्रुटी काढल्या आहेत. एवढेच नव्हे, तर 10 वीच्या निकालांचा फॉर्मुला 12 वीच्या निकालांनाही लागू करणे योग्य ठरणार नाही असा इशारा देखील दिला. यामुळे, उच्च शिक्षण घेण्याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.

तत्पूर्वी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1 जून रोजी देशभरातील 12 वीच्या परीक्षा रद्द करत असल्याची घोषणा केली. मोदींनी ही घोषणा करताना 12 वीचे निकाल तार्किक पद्धतीने वेळेच्या आत जारी केले जातील असे म्हटले. अशात विद्यार्थ्यांचे मूल्यमापन नेमके कसे होणार यावर वाद सुरू झाला आहे.

10 वीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे
10 वीच्या परीक्षा आधीच रद्द करण्यात आला. तसेच त्याचे निकाल कसे जारी केले जाणार यावरही निर्णय घेण्यात आला. 10 वीचे निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे केले जातील. हे निकाल तयार करण्यासाठी 5 सदस्यीय शिक्षकांची टीम असेल. हीच टीम विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करणार आहे.

सर्व शाळांमध्ये युनिट टेस्ट, मिड टर्म एकसारखे नाहीत
तज्ज्ञांच्या मते, सर्वच शाळांमध्ये युनिट टेस्ट आणि मिड टर्म परीक्षांचा कालावधी आणि सक्ती एकसारखी नाही. काही शाळांमध्ये युनिट टेस्ट सक्तीने घेतल्या जातात. प्री-बोर्ड एक्झाम सुद्धा आयोजित केले जातात. परंतु, बऱ्याच शाळांमध्ये युनिट टेस्टची सक्ती केली जात नाही.

काय म्हणाले एक्सपर्ट?

 • द इंडियन स्कूलच्या प्राचार्या तानिया जोशी यांच्या मते, आम्हाला फक्त दोन अंक कमी किंवा जास्त करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. यामुळे हायस्कोअर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. कारण, अंतर्गत परीक्षांमध्ये खूप सक्तीने पेपर तपासला जातो. यात विद्यार्थी केवळ 70-80% इतकेच मार्क मिळवतात.
 • जोशी पुढे म्हणाल्या, की मूल्यमापनात एक समस्या आहे. रेफरन्स इयरचा विचार केल्यास 90% पेक्षा अधिक स्कोअर करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 10 असेल तर याचा अर्थ आता वार्षिक निकालात सुद्धा केवळ 10 विद्यार्थीच 90% पेक्षा अधिक मार्क घेऊ शकतील. त्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अधिक गुण घेणे शक्यच होणार नाही.
 • पुष्प विहारमध्ये एमिटी इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या अमिता मोहन यांनी सांगितल्याप्रमाणे, मॉडरेशन पॉलिसी आवश्यक आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. ज्यात विद्यार्थ्यांनी अंतर्गत परीक्षांमध्ये 33% पेक्षा कमी गुण मिळवले. आणि मुख्य वार्षिक परीक्षेत त्यांना 70% पर्यंत गुण मिळाले आहेत. त्यामुळे कमाल 2 मार्कची परवानगी 4 मार्क पर्यंत वाढवावी.
 • RGPV सूरजमल विहारचे प्राचार्य आरपी सिंह यांनी सांगितल्याप्रमाणे, मॉडरेशन धोरण कित्येक वर्षांपासून सुरू आहे. माझा वैयक्तिक सल्ला राहील की 11 वीच्या परीक्षांच्या निकालांचा यात विचार करायला हवा. 10 वीच्या परीक्षांचा नियम केवळ मुख्य विषयांवरच लागू करावा.

सध्या कोणत्या फॉर्मुल्यावर विचार?

 1. विद्यार्थ्यांचे निकाल मूल्यमापनाच्या आधारे 3 वर्षांच्या त्यांच्या परफॉर्मन्सनुसार होणार आहे. अर्थात 12 वीचा निकाल जारी करताना 9 वी, 10 वी आणि 11 वीच्या निकालांचा विचार केला जाऊ शकतो.
 2. 10 वी प्रमाणेच 12 वी साठी देखील ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची तयारी आहे. एखाद्या विद्यार्थ्याला मूल्यमापनावरून तयार केलेली मार्कशीट समाधानकारक वाटत नसेल तर त्यांना अशी परीक्षा देता येईल. परंतु, या परीक्षेसाठी कोरोना महामारीची परिस्थिती सामान्य होईपर्यंत वाट पाहावी लागेल.
 3. 10 वी बोर्डाचे निकाल आणि 12 वीचे अंतर्गत परीक्षांचे मार्क यांना आधार मानत निकाल तयार केला जाऊ शकतो.
 4. 11 वी आणि 12 वीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारेच 12 वीचा निकाल तयार केला जाऊ शकतो.
बातम्या आणखी आहेत...