आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:सीबीएसई दहावी, बारावीच्या मूल्यांकनावर देणार निकाल, 15 जुलैपर्यंत जाहीर करणार, सुप्रीम कोर्टाने दिली मंजुरी

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता दहावी व बारावीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षा रद्द केल्यानंतर शुक्रवारी या विषयांच्या मूल्यांकनासंबंधी अधिसूचना काढली. त्यानुसार, विद्यार्थ्यांना परीक्षा घेण्यात आलेल्या ज्या विषयांत चांगले गुण आहेत त्या आधारे रद्द विषयांना गुण देण्यात येतील. सीबीएसईच्या या योजनेला सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आहे.

गुरुवारी सीबीएसई आणि केंद्र सरकारने १०वी व १२वीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. न्या. ए. एम. खानविलकर यांच्या न्यायपीठासमोर सीबीएसईने या मूल्यांकनासंबंधीच्या योजनेचा आराखडा व शपथपत्र सादर केले होते. त्याला कोर्टाने मंजुरी दिली. दरम्यान, इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (आयसीएसई) लवकरच मूल्यांकनासंबंधी योजना जाहीर करू, असे कोर्टात सांगितले. कोरोना महामारीत १०वी, १२वीच्या २९ विषयांची परीक्षा होऊ शकलेली नाही.

पूर्व दिल्लीत फेब्रुवारीमध्ये हिंसाचार भडकल्यामुळे १२वीच्या एक किंवा दोन विषयांची परीक्षा होऊ शकली नव्हती. याबाबत परीक्षा नियंत्रक संजय भारद्वाज म्हणाले की, त्यांनी दिलेल्या परीक्षेच्या आधारे अंतर्गत मूल्यांकन करून निकाल दिला जाईल.

सीबीएसईची मूल्यांकन योजना

१. ज्यांच्या सर्वच विषयांच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत त्यांचे काय?

परफॉर्मन्सच्या आधारे मूल्यांकन. यानंतर परीक्षा देण्याची संधी नसेल. पूरक परीक्षेचा पर्याय असेल.

२. तीनहून अधिक विषयांच्या परीक्षा दिलेल्यांसाठी काय?

सर्वात चांगले गुण असलेल्या तीन विषयांच्या सरासरी गुणांच्या आधारे उर्वरित विषयांना गुण दिले जातील. म्हणजे बेस्ट ऑफ थ्रीचा निकष.

३. ज्यांची तीन विषयांचीच परीक्षा झाली आहे त्यांच्यासाठी काय?

बेस्ट ऑफ टूचा निकष यासाठी असेल.

४. १२ वीच्या उर्वरित विषयांची पुन्हा परीक्षा होईल?

कोरोना महामारीचे हे भयंकर संकट सरल्यावर १२वीच्या उर्वरित विषयांची परीक्षा विद्यार्थ्यांना देता येईल. याची तारीख नंतर ठरेल. सर्व विषयांची परीक्षा झालेल्यांना ही संधी नसेल. दहावीच्या विद्यार्थ्यांना इम्प्रूव्हमेंट परीक्षा देण्याचा पर्याय नसेल.

बातम्या आणखी आहेत...