आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीएसईचा इशारा:1 एप्रिलपूर्वी सत्र सुरू करू नये, अन्यथा विद्यार्थ्यांमध्ये थकवा, चिंता निर्माण होते

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) संलग्न शाळांना शैक्षणिक सत्र एक एप्रिलच्या आधी सुरू करू नये, अशी स्पष्ट सूचना केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंता व थकवा निर्माण होतो. काही शाळांना दहावी व बारावीचे शैक्षणिक सत्र सुरू केल्यानंतर सीबीएसईचा हा इशारा आला आहे. सीबीएसईचे सचिव अनुराग त्रिपाठी यांच्या आदेशात संलग्न शाळांनी शैक्षणिक सत्र सुरू केल्याचे दिसून आले आहे, असे म्हटले आहे. शैक्षणिक सत्र लवकर सुरू करणे योग्य नाही.

बातम्या आणखी आहेत...