आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीत सिगारेटसाठी 10 रुपये न दिल्याने एका अल्पवयीन मुलाची भरदिवसा भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजधानी दिल्लीतील आनंद पर्वत परिसरात सोमवारी ही घटना घडली असून, मंगळवारी मृतदेह सापडल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
दिल्ली पोलिसांच्या डीसीपी (मध्य) श्वेता चौहान यांनी सांगितले की, रामजस शाळेजवळ मंगळवारी एक मृतदेह आढळून आला, ज्याच्या पोटावर चाकूने भोसकल्याच्या खुणा होत्या. हा मृतदेह आनंद पर्वत येथील रहिवासी विजय याचा असल्याचे समजते. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पैसे न देण्यावरून भांडण
डीसीपी म्हणाल्या की, चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, अल्पवयीन मुलाने आरोपीला सिगारेटसाठी पैसे दिले नव्हते. यावरून वाद झाला, त्यानंतर ही घटना घडली. प्रवीण (20), जतीन (24), अजय (23) आणि सोनू (20) अशी आरोपींची नावे आहेत. या सर्वांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्यांना कारागृहात पाठविण्याची कार्यवाही सुरू आहे.
आरोपींमध्ये चालक-मजूर
आरोपी प्रवीण हा मजूर म्हणून काम करतो, तर जतीन हा ड्रायव्हर आणि बाबा फारुकी हा सेल्समन म्हणून काम करतो, असे दिल्ली पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय चौथा आरोपी सोनू टेलर हा सूत्रधार आहे.
मध्य प्रदेशातही घडली होती अशी घटना
अशीच एक घटना एप्रिलमध्ये मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात घडली होती. फुकटात सिगारेट न दिल्याने चार तरुणांनी दुकानदाराची हत्या केली होती. तेथेही पोलिसांनी 50 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज गोळा करून आरोपींना पकडले होते. सध्या हे सर्व आरोपी तुरुंगात आहेत.
दिल्लीमध्ये गुन्हेगारीत वाढ
15 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्ध झालेल्या दिल्ली पोलिसांच्या अहवालानुसार, राजधानीत गेल्या दशकात IPC आणि गैर-IPC अंतर्गत नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या 200% वाढली आहे. 2011 ते 15 ऑगस्ट 2021 या कालावधीत दिल्लीतील गुन्हेगारीचा आलेख 228.61% वाढला आहे. 2011 मध्ये येथे आयपीसी अंतर्गत एकूण 53 हजार 353 गुन्हे दाखल करण्यात आले होते. 2021 मध्ये हा आकडा एक लाख 75 हजार 327 वर पोहोचला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.