आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्यनाथ सरकारची योजना:यूपीतील 16 शहरांची सीसीटीव्हीने निगराणी ; गुन्हेगारी राेखण्यासाठी उचलली पाऊले

लखनऊ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशातील स्मार्ट सिटीसह इतर शहरांना अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने ५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. राज्यातील १६ शहरांमध्ये अशी निगराणी ठेवण्यात आली आहे.प्रमुख रस्ते, महामार्ग, रेल्वे, मेट्राे स्टेशन हे निगराणीखाली आले आहेत. गुन्हेगारी तसेच समाजविघातक घटक यांना राेखण्यासाठी अशी सुरक्षा महत्त्वाची ठरते. कानपूर, लखनऊ, आग्रा, वाराणसी, प्रयागराज, अलिगड, झाशी, सहारनपूर, माेरादाबाद इत्यादी शहरांत अशा प्रकारचे कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याशिवाय अयाेध्या, मथुरा-वृंदावन, गाझियाबाद या शहरांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी आवश्यक निधीस मंजुरी देण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...