आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा८ डिसेंबर रोजी कुन्नूरमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात आपण पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि ११ अधिकाऱ्यांना गमावले. अपघाताची चौकशी सुरू आहे. यादरम्यान, संरक्षण आणि हवाई वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी अपघाताची संभाव्य कारणे सांगितली... - देशात हेलिकॉप्टर व्हिज्युअल फ्लाइट रुल्सने(व्हीएफआर) उडतात. म्हणजे, पाहा आणि वाचा. विमान इन्स्ट्रुमेंट फ्लाइट रूल्सनुसार(आयएफआर) उडतात. उड्डाणादरम्यान एटीएसकडून उपकरणांची मदत मिळते. - कुन्नूरमध्ये हिवाळ्यात ढग कमी उंचीवर असतात. दृश्यमानता घटते. अशात “पाहा व वाचा’ नियम धोक्यात घालतो. जेवढे उंच जाल, तेवढी उड्डाण क्षमता घटते. - खराब हवामानात हेलिकॉप्टर अडकल्यास ३ पर्याय-१. हवामान जास्त खराब होण्याआधी लँड करा.२. मार्ग बदला.३.एटीसीशी संपर्क करून आयएफआर प्लाइट प्लॅन स्वीकारा. - कुन्नूरच्या पर्वतांमध्ये पहिल्या-दुसऱ्या पर्यायाची व्यावहारिक मर्यादा आहे. वेलिंग्टनच्या हेलिपॅडकडून आयएफआर मदत शक्य नव्हती, त्यामुळे तिसरा पर्याय रद्द होतो. अशात ढग खूप खाली राहिल्याने अपघाताची शक्यता वाढते. हेलिकॉप्टर खालील ढगांत व पर्वतांत अडकते. - पर्वतीय क्षेत्र व्हीएफआर हेलिकॉप्टरसाठी जाळे ठरते. हेलिकॉप्टर पर्वतातही खालील उड्डाण घेतात. भारत यात कोसो दूर आहे. - एमआय-१७ आयएफआरयुक्त आहे. मात्र, हवामानात अडकलेल्या हेलिकॉप्टरला वेलिंग्टनहून आयएफआरची मदत मिळू शकत नव्हती.
४०० मी.वर उडत होते, लँड१५०० मी.वर होणार होते
निवृत्त एअर मार्शल जे.एस.चौहान, निवृत्त एअर कमोडोर आर.एन.गायकवाड म्हणाले, हेलिकॉप्टरला वेलिंग्टनमध्ये १५०० मी. उंचीवर स्थापन हेलिपॅडवर लँड व्हायचे होते. मात्र, ते एवढ्या कमी उंचीवर उडत होते की ४०० मी. उंचीवरच क्रॅश झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.