- Marathi News
- National
- CDS General Bipin Rawat Crematorium Photos Latest Update | Delhi Cantt Brar Square Crematorium
प्रथमच लष्करी अधिकाऱ्याला असा निरोप:अंत्ययात्रेला जनतेकडून फुलांचा वर्षाव, शव वाहनासोबत धावताना दिसले लोक; फोटोंमध्ये पाहा जनरल रावत यांचा अंत्यविधी
नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
भारताचे पहिले चीफ ऑफ आर्मी स्टाफ बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका अनंतात विलीन झाले. दिल्ली कँटमध्ये संध्याकाळी 4:56 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन्ही मुलींनी आपल्या आई-वडिलांना एकाच चितेवर मुखाग्नी दिला. जनरल रावत यांनी देश आणि लष्करासाठी केलेली कामगिरी त्यांच्या अंत्यविधी दरम्यान लोकांच्या भावनांतून व्यक्त होत होती.
फोटोंमध्ये पाहा, सीडीएस जनरल रावत यांना अखेरचा निरोप....
जनरल रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी 11 वाजता दिल्लीतील त्यांच्या घरी आणले गेले. या ठिकाणी केवळ लष्करी अधिकारी, जवानच नव्हे, तर नागरिक सुद्धा सॅल्युट करताना दिसून आले.
जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांना श्रद्धांजली अर्पित करताना राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेते.
राहुल गांधींनी जनरल रावत आणि मधुलिका रावत यांच्या दोन्ही मुली कृतिका आणि तारिणी यांचे सांत्वन केले.
गृहमंत्री अमित शहांनी जनरल रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांना श्रद्धांजली वाहिली.
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी संरक्षण मंत्री एके अँटणी यांनी देखील रावत यांना श्रद्धांजली दिली.
जनरल बिपिन रावत आणि मधुलिका यांच्या नातेवाइकांसह सामान्य नागरिकांनीही साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.
जनरल रावत यांची ज्येष्ठ कन्या कृतिका आपल्या मुलाच्या हातात फुले देऊन आजी-आजोबांच्या पार्थिवावर अर्पित करण्यास सांगताना. यावेळी काय घडले हे माहित नसलेला चिमुकला फुलांसोबत खेळत होता.
जनरल रावत यांच्या घराबाहेर त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी देशभरातून आलेले लोक रांगा लावून उभे होते. ज्यांना अंत्यदर्शन करता आले नाही त्यांनी बाहेरूनच फुले वाहिली.
संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास जनरल रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांचे पार्थिव अंतिम संस्कारासाठी सन्मानपूर्वक बराड स्क्वेअरमध्ये घेऊन जाताना सैनिक.
जनरल रावत आणि मधुलिका यांच्या अंत्यदर्शनासाठी जमलेले लोक.
जनरल रावत यांच्या पार्थिव शरीराला तोफगाडीत बराड स्क्वेअरमध्ये आणण्यात आले. यावेळी लोक वाहनाच्या मागे-मागे धावताना दिसून आले.
जनरल रावत यांचे पार्थिव शरीर आणताना एक झलक मिळविण्यासाठी उत्सुक लोक.
जनरल रावत यांच्या अंत्यविधीसाठी पार्थिव शरीरावरून तिरंगा हटवण्यात आला. हेच राष्ट्रध्वज त्यांच्या दोन्ही मुलींना सन्मानपूर्वक देण्यात आले.
हिंदू धर्माच्या परमपरेनुसार अंत्यविधी पार पडला. दोन्ही मुलींनी आई-वडिलांच्या देहांवर चंदनाचा लेप लावला.
दोन्ही मुलींनी आई-वडिलांच्या पार्थिव शरीरावर चंदन आणि तूप टाकून विधी पूर्ण केला.
जनरल रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांना एकाच चितेवर दोन्ही मुलींनी मुखाग्नी दिला. यावेळी संपूर्ण परिसर घोषणांनी दुमदुमला.
जनरल रावत यांना 17 तोफांची सलामी देण्यात आली. यावेळी 800 जवान उपस्थित होते. तिन्ही दलांच्या जवानांनी बिगुल वाजवला. सोबतच, लष्करी बँडने शोक गीत गायले.
आई-वडिलांच्या चितेला मुखाग्नी दिल्यानंतर दोन्ही मुली गहिवरल्या. यावेळी नातेवाइक त्या दोघींचे सांत्वन करत होते.