आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Cds Rawat Chopper Crash | Marathi News | 4 Air Force And 2 Army Personnel Killed In Accident Identified

CDS रावत चॉपर क्रॅश:अपघातात प्राण गमावलेल्या 4 हवाई दल आणि 2 लष्करी जवानांची ओळख पटली, मृतदेह लवकरच कुटुंबीयांच्या ताब्यात देणार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

तामिळनाडूतील कुन्नूर येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेल्या भारतीय हवाई दल (IAF) आणि भारतीय लष्कराच्या जवानांच्या मृतदेहांची ओळख पटली आहे. यामध्ये 4 IAF जवान JWO प्रदीप ए, विंग कमांडर PS चौहान, JWO राणा प्रताप दास आणि स्क्वाड्रन लीडर कुलदीप सिंग यांचा समावेश आहे. लष्कराच्या 2 जवानांच्या मृतदेहाची सकारात्मक ओळख पटली आहे. यामध्ये लान्स नायक केबी साई तेजा आणि लान्स नायक विवेक कुमार यांचा समावेश आहे.

शहीद हवाई दलाच्या जवानांचे मृतदेह लवकरच त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवले जातील, असे आयएएफने म्हटले आहे. भारतीय लष्कराने सांगितले की, जवानांचे पार्थिव आज जवळच्या कुटुंबीयांना सुपूर्द केले जातील. अपघातात शहीद झालेल्या उर्वरित जवानांच्या मृतदेहांची ओळख पटवली जात आहे.

हेलिकॉप्टरमध्ये 14 लोक होते, 13 जणांचा मृत्यू झाला
देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांचे बुधवारी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. या हेलिकॉप्टरमध्ये पत्नी मधुलिका यांच्याशिवाय 13 लष्करी जवान आणि अधिकारी होते. या अपघातामध्ये ब्रिगेडियर एलएस लिद्दर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, विंग कमांडर पीएस चौहान, स्क्वाड्रन लीडर के सिंग, नायक गुरसेवक सिंग, नायक जितेंद्र कुमार, लान्स नायक विवेक कुमार, लान्स नायक बी. साई तेजा, ज्युनियर वॉरंट ऑफिसर दास, ज्युनियर वॉरंट ऑफिसर ए प्रदीप आणि हवालदार सतपाल शहीद झाले. हेलिकॉप्टर अपघातात ग्रुप कॅप्टन वरुण सिंग हे एकमेव बचावले आहेत.

बातम्या आणखी आहेत...