आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना व्हॅक्सिन अपडेट:तज्ज्ञ समितीने आपत्कालीन वापरासाठी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला दिली मान्यता; देशात दुसर्‍या लसीची अपेक्षा वाढली

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तज्ज्ञ पॅनेलने एका दिवसापूर्वीच सीरम इन्स्टिट्यूटच्या कोवीशिल्डला आपातकालिन वापरासाठी सशर्त मंजुरी दिली होती

देशात आता दोन कोरोना लसींचा आपतकालीन वापर लवकरच सुरू होऊ शकेल. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) च्या तज्ज्ञ पॅनेलने शनिवारी भारत बायोटेक कोव्हॅक्सिनला कडक निर्बंधासह आपतकालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने हे माहिती दिली. तज्ज्ञ पॅनेलने एका दिवसापूर्वीच सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्डला आपतकालीन वापरासाठी सशर्त मंजुरी दिली होती. आता दोन्ही लसींना ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात DCGIकडून मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...