आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Ceasefire Violations By Pakistan In Kashmir's Naugam And Poonch Sectors; 3 Indian Soldiers Martyred And 5 Wounded

पाकिस्तानकडून गोळीबार:काश्मीरच्या नौगाम आणि पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून सीजफायर वॉयलेशन; भारतीय सैन्यातील 3 जवान शहीद आणि 5 जखमी

श्रीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरमध्ये एलओसीवर पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात भारताचे 3 जवान शहीद, तर 5 जखमी झाले आहेत. आर्मीच्या सूत्रांनी सांगितले की, हे जवान पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराला प्रत्युत्तर देत होते.

संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील नौगाम सेक्टरमध्ये गुरुवारी पाकिस्तानी सैन्याने मोर्टार फायर केले. यात दोन जवान शहीद आणि चार जखमी झाले. जखमींना आर्मी हॉस्पीटलमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. दरम्यान, भारताकडून देण्यात आलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे किती जवान मारले गेले, याची अद्याप माहिती समोर आली नाही.

पुंछमध्येही फायरिंग, एक जवान शहीद

यापूर्वी, पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने संघर्ष विरामाचे उल्लंघन केले. याथे झालेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद आणि एक जवान जखमी झाला. पाक्सानने मागील आठ महिन्यात 3,000 पेक्षा जास्त वेळा सीजफायर वॉयलेशन केले आहे. मागील 17 वर्षातील हा सर्वात मोठा आकडा आहे.