आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अयोध्या:5 ऑगस्टला घरोघर दीपोत्सव साजरा करा : उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

अयोध्या3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संतांना निमंत्रण शक्य नाही, भूमिपूजनाचे थेट प्रक्षेपण

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ५ ऑगस्टला घरोघर दीपोत्सव साजरा करावा, असे आवाहन केले आहे. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होत आहे. या सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आदित्यनाथ शनिवारी अयोध्येत दाखल झाले. राम जन्मभूमीवर भगवान रामलल्लांच्या दर्शनानंतर त्यांनी साधू-संतांशी चर्चा केली. तसेच भूमिपूजनाच्या तयारीची माहिती घेतली.

हनुमान गढी आणि कोरीव शिळांची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री योगी यांनी राम मंदिर ट्रस्ट आणि अयोध्येतील साधू-संत तसेच स्थानिक अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ते म्हणाले, “५०० वर्षांनंतर अयोध्येत हा शुभमुहूर्त आला आहे. संपूर्ण जग हा भव्य कार्यक्रम पाहील. ५ ऑगस्टला सर्व नियमांचे पालन करून भूमिपूजनाचा कार्यक्रम होईल. अयोध्येत राम जन्मभूमीसाठी संघटित होऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि संतांच्या मार्गदर्शनाखाली विश्व हिंदू परिषदेने देशव्यापी आंदोलन केले. याचाच परिणाम पहावयास मिळतो आहे. या सोहळ्यात २०० निमंत्रित सहभागी होतील. या वेळी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जाईल.’

संतांना निमंत्रण शक्य नाही, भूमिपूजनाचे थेट प्रक्षेपण
कोरोना संसर्ग पाहता साधू-संतांना रामजन्मभूमी परिसरात बोलावणे शक्य नाही. या सोहळ्यात फक्त २०० निमंत्रित असतील. हा प्रतिष्ठेचा मुद्दा करू नयेे. लोकांच्या सोयीसाठी भूमिपूजनाचे थेट प्रक्षेपण केले जाईल, असे आदित्यनाथ यांनी सांगितले.