आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Celebrities Support To Farmers Protest, Foreign Ministry Has Given Stern Reaction

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ सेलिब्रेटी:हॉलिवूड स्टार अमांडा आणि गायिका रिहाना यांनी पाठिंबा दर्शविला, परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले - टिप्पणी करण्यापूर्वी हे प्रकरण जाणून घ्या

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेतकरी आंदोलनाला मिया खलिफाने पाठिंबा दिला असून आपण शेतकऱ्यांसोबत असल्याचे तिने म्हटले

भारतात 70 दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला जगभरातील अनेक बड्या व्यक्तींचे समर्थन मिळाले आहे. हॉलिवूड अभिनेत्री अमांडा, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या भाची मीना हॅरिस, नॉर्वेची 18 वर्षांची पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, पॉप गायिका रिहाना, मियाँ खलिफा यांसह परदेशातील अनेक सेलिब्रिटींनी शेतकऱ्यांना आपला पाठिंबा दिला आहे. या सर्व सेलिब्रिटींच्या विधानावर परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र प्रक्रिया दिली आहे.

परराष्ट्र सचिव म्हणाले, आधी माहिती घ्या

अनेक सेलिब्रिटींनी आंदोलनास पाठिंबा दिल्यानंतर परराष्ट्र सचिव म्हणाले की, 'हे दुःख आहे. बरेच लोक त्यांचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी या आंदोलनाचा सहारा घेत आहेत. अशा लोकांनी भाष्य करण्यापूर्वी याबद्दल पूर्ण माहिती घ्या. तथ्य तपासा. सोशल मीडियावर हे सनसनाटी बनवू नका. संसदेत चर्चा केल्यानंतरच हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे.'

काय म्हणाली मिया खलिफा

मिया खलिफाने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केली असून त्यात म्हटले की, मानवाधिकाराचे इथे उल्लंघन होत आहे. नवी दिल्लीच्या आसपासच्या परिसरात इंटरनेट बंद केले आहे. दुसऱ्या पोस्टमध्ये तिने काही कलाकारांवर निशाणा साधत म्हटले आहे की, पेड अॅक्टर्स... मला खात्री आहे की, पुरस्कारांवेळी यांचे नावाला डावलले जाणार नाही. मी शेतकऱ्यांच्या सोबत आहे, असे तिने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...