आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Center May Announce 20,000 Crore Rupee Emergency Covid Response Preparedness Package; News And Live Updates

कोरोनाची तिसरी लाट थांबवण्याची तयारी:केंद्र सरकार 20 हजार कोटींचे कोविड रिस्पॉन्स पॅकेज जाहीर करण्याची शक्यता

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या वर्षी 15 हजार कोटींचा पॅकेज

देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रार्दुभाव हळूहळू कमी होताना दिसत आहे. परंतु, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार कोरोनाची तिसरी लाट थांबवण्यासाठी 20 हजार कोटींचे आपत्कालीन कोविड रिस्पॉन्स पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, कोरोना महामारीची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी हे पाऊल असल्याचे सांगितले आहे:

आरोग्य आणि वित्त मंत्रालये तयारी करीत आहेत

सूत्रांच्या माहितीनुसार, आरोग्य व वित्त मंत्रालय एकत्रितपणे कोविड रिस्पॉन्स पॅकेजची तयारी करत आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर हे पॅकेज जाहीर केले जाईल. या पॅकेजचे उद्दिष्टे कोरोना काळात लागणार्‍या उपचारांच्या सुविधा वाढविण्यावर असणार आहे. यामध्ये रुग्णालयांमधील बेडची संख्या वाढविणे, आवश्यक वैद्यकीय उपकरणे व औषधे खरेदी करणे, राष्ट्रीय व राज्य आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे. त्यासोबतच देशात अधिकाधिक प्रयोगशाळा-चाचणी केंद्रे स्थापन करणे याचा समावेश असणार आहे.

तिसर्‍या लाटाच्या चेतावणीमुळे तयारी

देशात डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्र सरकारने याला धोकादायक घोषित केले आहे. डेल्टा प्लसचे प्रकरणे सध्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आण‍ि केरळ राज्यात सर्वात जास्त आहे. त्यामुळे सरकारने या राज्यांना तयारीत राहण्याचा इशारा दिला आहे. त्यासोबतच याला रोखण्यासाठी उपाययोजना, चाचणी आण‍ि लसीकरणाची गती वाढवायलादेखील सांगितलेले गेले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे पॅकेज आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय राबवणार आहे. या पॅकेजचा मोठा भाग आयसीएमआर आणि इतर संस्थांना दिला जाणार आहे.

गेल्या वर्षी 15 हजार कोटींचा पॅकेज
कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या वर्षी 15 हजार कोटींचा पॅकेज जाहीर केला होता. यातील 50 टक्के भाग हे कोरोनाविरुद्धच्या लढाईत खर्च करण्यात आला होता. तर उर्वरित निधी हे डायग्नोस्टिक लॅब स्थापित करण्यासाठी आणि पीपीई किट्सचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी केला गेला आहे.

बातम्या आणखी आहेत...