आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:केंद्राने गायीस संरक्षित राष्ट्रीय पशू जाहीर करावे : हायकोर्ट

लखनऊ24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ पीठाने सांगितले की, गायीला संरक्षित राष्ट्रीय पशू जाहीर करण्याची आवश्यकता आहे. देशात गोवध रोखण्यासाठी केंद्राने प्रभावी निर्णय घ्यावा.न्या. शमीम अहमद यांनी यूपी गोवध निवारण कायद्यांतर्गत आरोपी बाराबंकीचा रहिवासी मोहंमद अब्दुल खलीकची याचिका फेटाळली. याचिकाकर्ता गोवंश मांसासह पकडला होता. न्यायालय म्हणाले, देशात सर्व धर्मांच्या सन्मानासोबत हिंदूंमध्ये गायीला ईश्वराच्या प्रतिनिधीच्या रूपात श्रद्धा आहे. हिंदू धर्मात गायीला कामधेनूच्या रूपात पूजले जाते. तिचे पाय चार वेद, स्तन धर्म,अर्थ, काम, मोक्ष या रूपात ४ पुरुषार्थांचे प्रतिक मानले जाते.

बातम्या आणखी आहेत...