आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसदेत सरकारची माहिती:केंद्रीय कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांचे डीएचे एरिअर्स मिळणार नाहीत

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची थकीत रक्कम (एरिअर्स) दिली जाणार नाही, असे मंगळवारी केंद्र सरकारने संसदेत सांगितले. कोरोना काळातील १८ महिन्यांचा थकीत महागाई भत्ता आणि डीआरसंबंधित (थकीत रक्कम) एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. ते म्हणाले, केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांचा महागाई भत्ता (डीए) आणि थकबाकी (डीआर)ची थकबाकी आता देणे व्यावहारिक नाही. विविध केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या संघटनांनी डीए आणि थकबाकी मिळण्यासाठी अर्ज केले होते.

सन २०२० मध्ये कोरोना काळातील प्रतिकूल परिस्थिती आणि केंद्राच्या कल्याणकारी योजनांमुळे सन २०२०-२१ नंतरही त्याचा महसूलावर विपरित झाला. त्यामुळे थकबाकीची रक्कम अदा करणे परडवणारे नाही. कोरोनाचा आर्थिक फटका बसल्याने केंद्र सरकारने १ जानेवारी २०२० ते १ जानेवारी २०२१ पर्यंतचा महागाई भत्ता आणि थकबाकीचे ३ हप्ते रोखले होते.

बातम्या आणखी आहेत...