आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासरकारने सट्टेबाजी, जुगार (गॅम्बलिंग) आणि अनधिकृतरीत्या कर्ज देण्यात सहभागी असलेल्या चीनसह विदेशी कंपन्यांच्या २३२ अॅपवर बंदी घातली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गृह मंत्रालयाच्या निर्देशांनंतर हे पाऊल उचलले आहे.
एका आधिकाऱ्याने सांगितले, सट्टेबाजी, जुगार आणि मनी लाँड्रिंगमध्ये सहभागी १३८ अॅपवर बंदी घालण्याचे आदेश शनिवारी सायंकाळी देण्यात आले. याशिवाय अनधिकृत कर्ज सेवेत समाविष्ट ९४ अॅप ब्लॉक करण्याचे आदेशही देण्यात आले. हे अॅप चीनसह इतर देशांतील कंपन्या चालवत होत्या. काेराेनाकाळात टिकटाॅकसह अनेक चिनी कंपन्यांवरही केंद्र सरकारने बंदी घातली हाेती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.