आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • Central Government Bans 59 Chinese Apps, Including Tick Talk, Hello, Share It And UC Browser, News And Updates

चिनी अ‍ॅप्सवर बंदी:टिक-टॉक गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरमधून हटवले; प्रश्नोत्तरांमध्ये जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • केंद्र म्हणाले - हे अ‍ॅप देशाचे सार्वभौमत्व, अखंडता व सुरक्षेसाठी धोकादायक

चीनशी वाढत्या तणावादरम्यान भारत सरकारने साेमवारी रात्री टिकटाॅक, यूसी ब्राऊझर आणि शेअरइटसारख्या ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी आणली. सरकार म्हणाले, या अ‍ॅप्सद्वारे युजर्सची माहिती गोळा केली जात आहे. ती राष्ट्रीय सुरक्षा, सार्वभौमत्व व अखंडतेसाठी धोकादायक आहे. यातील टिक टॉक प्ले स्टोअर आणि अ‍ॅप स्टोअरमधून हटवण्यात आले आहेत. केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने आयटी अ‍ॅक्ट-२००९ च्या कलम-६९अ अंतर्गत चायनीज अ‍ॅपवर बंदीचा निर्णय घेतला. सरकार म्हणाले, भारत प्रमुख डिजिटल बाजार बनला आहे. भारतीयांच्या डेटा सुरक्षेच्या चिंता वाढत आहेत. चिनी अ‍ॅप देशासाठी धोकादायक असल्याचे निदर्शनास आले. अँड्राॅइड व आयओएसवर उपलब्ध या अ‍ॅप्सच्या माध्यमातून युजर्सची डेटा चाेरी होते किंवा डेटा चुकीच्या मार्गाने भारताबाहेरील सर्व्हरमध्ये ट्रान्स्फर होतोय.

टिकटॉकवर गतवर्षीही बंदी आणली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलासा दिला होता. तेव्हा सुप्रीम कोर्टात टिकटॉकने म्हटले होते की, बंदीमुळे रोज ३.५ कोटी रु.चे नुकसान होत आहे. म्हणजेच वर्षभरात १२०० कोटींपेक्षा जास्त. तेव्हा त्यांचे १२ कोटी युजर होते. आता भारतात त्यांचे ६१ कोटी डाऊनलोड झाले आहेत. जगभरातील ३०% टिकटॉक युजर भारतात आहेत. यावरून त्यांच्या नुकसानीचा अंदाज यावा.

भारतात काम करणाऱ्या कोणत्याही कंपनीत चीनी कंपनीची गुंतवणूक असल्यास सर्व माहिती चीन सरकारकडे पोहोचते

चीनमधील प्रत्येक खासगी कंपनीला सर्व डेटा चीन सरकारला द्यावा लागतो, असा नियमच चीनमध्ये आहे. इतकेच नाही तर परदेशातील एखाद्या कंपनीत चीनी कंपनीची गुंतवणूक असेल तर त्या कंपनीचाही डेटा चीन सरकारला द्यावा लागतो. तज्ज्ञांच्या मते, चीनी गुंतवणूक असलेल्या कंपन्याही भारतातील युजर्सचा खासगी डेटा आणि इतर गोष्टींंच्या दृष्टीने धोकादायक ठरु शकतात.

... या ९ कंपन्यांमध्ये चीनची मोठी गुंतवणूक आहे.

- बिगबास्केट: ही भारतातील सर्वात मोठी ऑनलाइन किराणा स्टोरची साखळी आहे.

- बायजूज: ऑनलाइन शिक्षण देणारा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे.

- ड्रीम-11: अलिकडेच भारतात लोकप्रिय झालेले ऑनलाइन गेमिंग अॅप.

- डेल्हीवरी: ई-कॉमर्स मध्ये साहित्याची डिलीव्हरी करणारी कंपनी.

- हाइक: ऑनलाइन मेसेजिंग अॅप.पण याची बाजारातील हिस्सेदारी फार नाही.

- फ्लिपकार्ट: देशातील ई-कॉमर्समध्ये निम्म्यापेक्षा जास्त हिस्सेदारी याचीच आहे.

- मेकमायट्रिप: देशातील सर्वात मोठे ट्रॅव्हल पोर्टल बनले आहे.

- ओला : भारतातील आॅनलाइन कॅब-टॅक्सी व्यवसायात निम्म्यापेक्षा जास्त वाटा एकट्या ओला कंपनीचा आहे.

- ओयो : बजेट हॉटेल संघटित क्षेत्रात निम्म्यापेक्षा जास्त वाटा या कंपनीचा आहे.

- पेटीएम मॉल : ई-कॉमर्समध्ये आपले स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे.

- पेटीएम: भारतात आॅनलाइन पेमेंटमध्ये सर्वात मोठा वाटा याच कंपनीचा आहे.

- पॉलिसी बाजार: ऑनलाइन विमा पॉलिसी विकणारी एक ई-कॉमर्स कंपनी.

- क्विकर: सेकंड हँड वस्तूंची विक्री व खरेदी करण्याचा लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे.

- रिव्हिगो: लॉजिस्टिक कंपनी अाहे.

- स्नॅपडील: मोठी ई-कॉमर्स कंपनी.

- स्विगी: ही देशातील एक लोकप्रिय आॅनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी आहे.

- उडान: बिझनेस ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म

- झोमॅटो: देशातील सर्वात मोठी आॅनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी.
- डेलीहंट: न्यूज प्लॅटफाॅर्म.

भास्कर Q&A
या अ‍ॅपपासून मला, देशाला कोणता धोका?

अ‍ॅप कंपनी युजरकडून फोनबुक, लोकेशन, व्हिडिओ आदींचे अ‍ॅक्सेस घेते. त्यानंतर कंपनी युजरच्या प्रत्येक हालचालीचा डेटा एकत्र करते. युजरची आर्थिक क्षमता आणि खरेदीची पद्धत समजून घेत प्रोफायलिंग केले जाते. चीन सरकारलाही हा डेटा मिळतो. यामुळे चिनी सरकार भारतीय बाजारपेठेनुसार रणनीती बनवते.

प्ले स्टोअरवरून चिनी अ‍ॅप कधी हटवणार?

सूचना जाहीर झाल्यानंतर २४ तासांत ही सूचना गुगल प्ले आणि अ‍ॅप स्टोअरला पोहोचेल. यावर त्यांना त्वरित अंमलबजावणी करावी लागेल.

मोबाइल युजरला काय करावे लागेल?

काहीच नाही. अ‍ॅप आपोआप निष्क्रिय होतील.

माझ्याकडील चिनी कंपनीचा मोबाइलमध्ये काही अ‍ॅप इनबिल्ट आहेत, त्यांचे काय?

सरकारकडून बंदी घातलेली अॅप्स आता कोणत्याही कंपनीच्या फोनमध्ये चालणार नाहीत. चायना मेड फोनमध्ये इन्स्टॉल असलेल्या काही अ‍ॅपवरही बंदी घातली आहे.

फोनमधील अ‍ॅपचा डेटा डिलीट होईल?

होय. या अ‍ॅप्समधील टेक्स्ट, ऑडिओ, व्हिडिओ आता पाहता येणार नाही.

अ‍ॅप कंपन्यांजवळ काेणता पर्याय आहे?

अ‍ॅपच्या भारतीय कार्यालयातील कर्मचारी न्यायालयात जाऊ शकतील. यापूर्वीही असे झाले आहे. केंद्र सरकारने म्हटले आहे की, राष्ट्रीय सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे चिनी कंपन्यांना दिलासा मिळण्याची शक्यता नाही.

या अ‍ॅप्सवर घालण्यात आली बंदी 

 • TikTok
 • Shareit
 • Kwai
 • UC Browser
 • Baidu map
 • Shein
 • Clash of Kings
 • DU battery saver
 • Helo
 • Likee
 • YouCam makeup
 • Mi Community
 • CM Browers
 • Virus Cleaner
 • APUS Browser
 • ROMWE
 • Club Factory
 • Newsdog
 • Beutry Plus
 • WeChat
 • UC News
 • QQ Mail
 • Weibo
 • Xender
 • QQ Music
 • QQ Newsfeed
 • Bigo Live
 • SelfieCity
 • Mail Master
 • Parallel Space
 • Mi Video Call – Xiaomi
 • WeSync
 • ES File Explorer
 • Viva Video – QU Video Inc
 • Meitu
 • Vigo Video
 • New Video Status
 • DU Recorder
 • Vault- Hide
 • Cache Cleaner DU App studio
 • DU Cleaner
 • DU Browser
 • Hago Play With New Friends
 • Cam Scanner
 • Clean Master – Cheetah Mobile
 • Wonder Camera
 • Photo Wonder
 • QQ Player
 • We Meet
 • Sweet Selfie
 • Baidu Translate
 • Vmate
 • QQ International
 • QQ Security Center
 • QQ Launcher
 • U Video
 • V fly Status Video
 • Mobile Legends
 • DU Privacy

याआधी रेल्वे-बीएसएनएलनेही चिनी कंपन्यांशी केलेला करार रद्द केला होता

रेल्वेने चिनी कंपनीबरोबर 471 कोटी रुपयांचा करार रद्द केला होता. यासोबत भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने 4 जी संसाधने सुधारित करण्यासाठी चीनी उत्पादनांच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. भारत सरकार चीनमधून आयात केलेल्या बर्‍याच उत्पादनांवर कस्टम ड्युटी वाढवू शकते, असेही म्हटले जात आहे. येत्या काही दिवसांत चीनबरोबरचे पुढील करार रद्द होऊ शकतात.