आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Central Government Begins Considering Options To Closing Lock Down After April 14; Schools, Colleges, Malls, Religious Sites Should Be Closed Until May 15: Ministries

युद्ध कोरोनाविरुद्ध:14 एप्रिलनंतर लॉकडाऊन उघडण्यासंबंधीच्या पर्यायांवर केंद्र सरकारचा विचार सुरू; शाळा-कॉलेज, माॅल, धार्मिक स्थळे 15 मेपर्यंत बंद ठेवावीत : मंत्रिगट

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊन सुरू ठेवावे : ८ राज्यांची शिफारस; ही राज्ये अशी -राजस्थान, महाराष्ट्र, म.प्र., तेलंगण, असम, छत्तीसगड, यूपी, झारखंड
  • लॉकडाऊन उघडण्याबाबत अजून कोणत्याही राज्याने मागणी केलेली नाही

१४ एप्रिलनंतर लॉकडाऊन वाढवले नाही तरी शाळा, कॉलेज, शॉपिंग मॉल व धार्मिक कार्यक्रम १५ मेपर्यंत बंद ठेवावेत, अशी शिफारस कोविड-१९ वर नेमलेल्या मंत्रिगटाने केली आहे. सूत्रांनुसार, १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन वाढवण्यात आले नाही तरी १५ मेपर्यंत उपरोक्त संस्था, मॉल बंद ठेवण्यात याव्यात, असा मंत्रिगटाचा आग्रह आहे. तसेच, धार्मिक स्थळांसोबत मॉलसारख्या सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये, याची दक्षताही घेतली जावी, असे मंत्रिगटाचे म्हणणे आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या वेळी गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. धार्मिक स्थळे, शॉपिंग मॉल आणि शैक्षणिक संस्थांत १४ एप्रिलनंतर किमान ४ आठवडे तरी कामकाज सुरू व्हायला नको, या निष्कर्षावर मंत्रिगट पोहोचला आहे. शैक्षणिक संस्था मेमध्ये उन्हाळ्याच्या सुटीत बंदच राहतील. त्यामुळे जूनअखेरपर्यंत त्या बंद ठेवता येऊ शकतील. त्यामुळे कोरोनाच्या फैलावाला आवर घालता येऊ शकेल. शिवाय, या काळात कोरोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने सुविधा वाढवल्या जाव्यात, अशी शिफारसही मंत्रिगटाने केली आहे. सार्वजनिक ठिकाणी देशभर ड्रोनच्या माध्यमातून निगराणी केली जावी, अशी शिफारसही मंत्रिगटाने केली असून यामुळे गर्दीवर आवर घालता येईल, असे यात नमूद करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील परिस्थितीचा आढावा घेऊन शिफारशी करण्याची जबाबदारी या मंत्रिगटावर सोपवण्यात आली आहे.

जास्तीत जास्त चाचण्या आता यासाठी गरजेच्या; २५ मार्चला लॉकडाऊन झाले, १४ दिवसांत टेस्ट पाचपट वाढल्या; परंतु रुग्णांची संख्या ९ पट वाढली... म्हणून राज्यांना अधिक चिंता

  • लॉकडाऊनचे १४ दिवस : एकूण टेस्ट : संसर्ग
  • 25 मार्चपर्यंत : 22,038 : 539
  • 31 मार्चपर्यंत : 42,788 : 1397
  • 7 एप्रिलपर्यंत : 1.1 लाख : 4998

आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, आगामी काळात रोज १ लाख टेस्टची तयारी आहे. बुधवारपासून देशभर हॉटस्पॉटवर रॅपिड अँडी बॉडी टेस्ट सुरू होईल. यासाठी ७ लाख किट आता उपलब्ध झाले आहेत. या रॅपिड टेस्टनंतर सामुदायिक स्तरावर किती संसर्ग झाला आहे हे स्पष्ट होऊ शकेल, असे सरकारला वाटते.

केजरीवाल यांचा ५ टी अॅक्शन प्लॅन; दिल्लीत होणार १ लाख रॅपिड टेस्ट

कोराेनाचा संसर्ग थांबवण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी ५ मुद्द्यांवर अॅक्शन प्लॅन जाहीर केला. हा ‘५-टी’ म्हणजेच टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट, टीमवर्क आणि ट्रॅकिंग-मॉनिटरिंग असा प्लॅन असेल. संसर्गाचा हॉटस्पॉट ठरलेल्या भागांत १ लाख रॅपिड टेस्ट केल्या जातील. दरम्यान, रुग्णांची संख्या ३० हजारांवर गेली तरी उपचारांची व्यवस्था असल्याचे केजरीवाल म्हणाले. टप्प्याटप्प्याने खासगी रुग्णालयांतील तसेच हॉटेल्समधील १२ हजार खोल्या अधिग्रहित केल्या जातील. 

बातम्या आणखी आहेत...