आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Central Government Fails To Control Outbreak Of Corona Virus, India Becomes Corona's Capital; Congress Alleges

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाशी युद्ध:प्रादुर्भाव रोखण्यात केंद्र सरकार अपयशी, कोरोनाची राजधानी बनला भारत; काँग्रेसचा आरोप

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज देश प्रत्येक चुकीत पुढे, मग तो कोरोना असो की जीडीपीतील घट : राहुल

देशात कोरोना रुग्णांची संख्या ४० लाखांच्या पुढे गेल्याने काँग्रेसने सोमवारी सरकारवर निशाणा साधला. पक्ष प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले, मोदीजी म्हणाले होते, महाभारतातील युद्ध १८ दिवस चालले. कोरोनाचे युद्ध जिंकण्यासाठी २१ लागतील. आज १६६ दिवसांनंतरही पूर्ण देशात कोरोना महामारीशी महाभारत सुरूच आहे. भारत जगाची कोरोना राजधानी झाली आहे. विचार न करता, न समजता लॉकडाऊनमुळे महामारी थांबली नाही. उलट देशाच्या अर्थव्यवस्थेचे आणि रोजगाराचे कंबरडे मोडले. तर पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी ट्वीट केले, मोदी सरकार देशाला संकटात टाकून तोडगा काढण्याऐवजी डोळे बंद करून घेते. प्रत्येक स्पर्धेत पुढे आहे, मग कोरोनाचे आकडे असोत की जीडीपीतील घट.

भाजप : नड्डा म्हणाले- आधी एकही व्हेंटिलेटर बनत नव्हते, आता तीन लाख बनवले

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारी झारखंड प्रदेश कार्यसमितीच्या पदाधिकाऱ्यांची डिजिटल बैठक घेतली. नड्डा म्हणाले, सत्ता मिळवण्यासाठी राजकारणात आलो नाही. देशाचे चित्र व नशीब बदलण्यासाठी आलो आहोत. आधी येथे एकही व्हेंटिलेटर तयार होत नव्हते. आता तीन लाख व्हेंटिलेटर बनवले. देशात रोज ४.५० लाख पीपीई किट बनवत आहोत. ते आपण दुसऱ्या देशातही पाठवत आहोत. कोरोना संकटात विकसित देशही स्वत:ला असहाय समजत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समोर होत कोरोनाशी युद्ध केले आहे. देशातील कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवले.

जेडीयू : नितीश म्हणाले- कोरोना काळात रोजगारावर काम केले, प्रचार केला नाही

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पहिली रॅली केली. त्यांनी विरोधकांवर व्यंग करत सांगितले, जे लोक काहीच करत नाहीत ते काहीही बोलतात. मात्र, त्यांनी जाणून घ्यायला हवे. कोरोना काळात आम्ही काम केले. आम्ही काम करतो, प्रचार करत नाही. लोकांना रोजगार देण्यासाठी सतत काम करत आहोत. कोरोना काळात १४.७१ कोटींपेक्षा जास्त मानव दिवस रोजगार निर्मिती केली. लोकांनी घाबरायची नाही तर सावध राहायची गरज आहे. आपण एका दिवसात १.५० लाखापेक्षा जास्त लोकांची चाचणी करत आहोत. आज दिलासा देण्याची अनेक कामे होत आहेत, आधी काय व्हायचे? काही मिळायचे का?