आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Central Government To Provide Free Vaccines To States, Clarifies Ministry Of Health

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्हॅक्सिनच्या दरावर राजकारण:राज्यांना मोफतच व्हॅक्सिन देणार केंद्र सरकार, आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण; कंपनीकडून थेट व्हॅक्सिन घेण्यासाठी द्यावे लागतील पैसे

नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकार राज्यांना कोरोनाच्या दोन्ही व्हॅक्सिन मोफत उपलब्ध करून देणार आहे. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, केंद्र सरकारसाठी कोरोनाच्या दोन्ही व्हॅक्सिनचे दर 150 रुपये प्रति डोस राहतील. या दरामध्ये केंद्र व्हॅक्सिन खरेदी करून पूर्वीप्रमाणेच राज्यांना देईल. कंपनीकडून थेट व्हॅक्सिन खरेदी करण्याच्या स्थितीमध्येच राज्य सरकारला व्हॅक्सिनचे पैसे द्यावे लागतील.

जयराम रमेश यांनी उपस्थित केले होते प्रश्न
यापूर्वी काँग्रेस नेता जयराम रमेश यांनी व्हॅक्सिनच्या दराबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी सोशल मीडियावर एक रिपोर्ट शेअर करत म्हटले होते की, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सीरम 600 रुपये प्रति डोसच्या दराने कोव्हीशील्ड व्हॅक्सिन देणार आहे. हे दर जगातील सर्वात जास्त आहेत.

राज्य सरकारांना हे व्हॅक्सिन 400 रुपये दराने मिळतील. हे अमेरिका, ब्रिटन, युरोपियन युनियन, सौदी, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकाच्या सरकारांकडून खर्च केल्या जाणाऱ्या दरापेक्षा जास्त आहेत. मेड इन इंडिया व्हॅक्सिनचा आपल्याच देशात एवढा जास्त दर का आहे? यामुळे या दरावर पुन्हा एकदा विचार करणे आवश्यक आहे.

कंपनीने सांगितले - प्रोडक्शन वाढवण्यासाठी गुंतवणुकीची आवश्यकता
व्हॅकिन दरावरून सुरु असलेल्या वादावर कोव्हीशील्डचे प्रोडक्शन करत असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटने स्पष्टीकरण दिले आहे की, व्हॅक्सिनचे काही डोसच प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 600 रुपये प्रति डोसने विकले जातील. हा दर आजही इतर मेडिकल ट्रीटमेंटच्या तुलनेत खूप कमी आहे. कंपनीनुसार ऍडव्हान्स फंडिंगमुळे सुरुवातीला व्हॅक्सिनचे दर जगभरात कमी होते. आता यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागेल. जास्त प्रोडक्शनसाठी कॅपिसिटी वाढवली लागेल.

कंपनीने सांगिलते की, भारत आणि जगात व्हॅक्सिन किंमतीमध्ये चुकीची तुलना करण्यात आली होती. कोव्हीशील्ड आज बाजारात उपलब्ध असलेली सर्वात स्वस्त कोरोना व्हॅक्सिन आहे. सध्या परिस्थिती खूप बिकट आहे. व्हायरस सतत म्यूट होत आहे. लोकांवरील धोका वाढत आहे. अशा स्थितीमध्ये महामारीपासून लढण्यासाठी आपली कॅपिसिटी वाढवून लोकांचा जीव वाचवणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...