आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Central Government Will Import 50 Thousand Metric Tons Of Medical Oxygen, 100 New Hospitals Will Be Built Across The Country; PM Modi Also Took Stock

12 राज्यांमध्ये ऑक्सीजनचे संकट:केंद्र सरकार 50 हजार मॅट्रिक टन मेडिकल ऑक्सीजन आयात करणार, 100 नवीन हॉस्पीटलमध्ये ऑक्सीजन प्लांट लागणार

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला ऑक्सीजनच्या परिस्थितीचा आढावा

देशभरात मेडिकल ऑक्सीजनचे संकट वाढत आहे. वेळेवर ऑक्सीजन मिळत नसल्याने अनेक कोरोना रुग्णांचे प्राण जात आहेत. आता केंद्र सरकार यातून मार्ग काढण्याची तयारी केली आहे. सरकारने तात्काळ 50 हजार मॅट्रीक टन मेडिकल ऑक्सीजनची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारच्या इंपॉवर्ड ग्रुप-2 (EG2)च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, पीएम केअर्स फंडच्या मदतीने देशभरातील 100 नवीन हॉस्पीटलमध्ये ऑक्सीजन प्लांट लावण्याचा निर्णय घेण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील ऑक्सीजनचे संकट पाहता अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी मेडिकल ऑक्सीजनची प्रोडक्शन क्षमता आणि इतर मेडिकल इक्यूपमेंट्सच्या उपलब्धतेबद्दल अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

या 12 राज्यात ऑक्सीजनचे संकट

दिल्लीमध्ये गुरुवारी झालेल्या EG2 च्या बैठकीत त्या राज्यांबाबत चर्च झाली, जिथे सर्वाधिक ऑक्सीजनचे संकट आहे. यात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान सामील आहेत. महाराष्ट्रात मेडिकल ऑक्सीजनची मागणी राज्यातील एकूण ऑक्सीजनच्या उत्पादनापेक्षा जास्त झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...