आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Central Government Will Provide Helpline Number For Corona Warrior Nurses, Medical Staff

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्मचाऱ्यांचे संरक्षण:काेराेना योद्धा नर्स, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी केंद्र देणार हेल्पलाइन क्रमांक

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारने दिली माहिती, नर्स असोसिएशनची याचिका निकाली

कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या नर्स तसेच इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाबाबतच्या अडचणी आणि तक्रारी ऐकण्यासाठी केंद्र सरकार हेल्पलाइन क्रमांक जाहीर करणार आहे. त्यावर तक्रार आल्यानंतर दोन तासांत तिचे निवारण केले जाणार आहे.

ही माहिती केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला दिली. त्यानंतर न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा, संजय किशन कौल आणि बी. आर. गवई यांच्या पीठाने युनायटेड नर्स असाेसिएशनची याचिका निकाली काढली. त्याआधी याचिकाकर्त्यांचे वकील सुभाषचंद्र यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीच्या वेळी सांगितले की, नर्स तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यांच्या तक्रारी ऐकूनही घेतल्या जात नाहीत. त्यावर मेहता म्हणाले, सर्व अडचणींची माहिती व त्या सोडवण्यासाठी सरकार हेल्पलाइन तयार करून २ तासांत समस्या सोडवेल. कोरोनाचा संसर्ग बघता नर्सनी त्यांच्यासाठी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षेसाठी पुरेसे उपाय करण्याची मागणी करत याचिका दाखल केली होती.

कोरोना व्हायरसवर नव्या प्रयोगांना परवानगी नाही

कोरोनावर होमिओपॅथी, युनानीसारख्या पर्यायी औषधांचा वापर करण्याची मागणी करणारी याचिकाही कोर्टाने फेटाळली. होमिओपॅथी डॉक्टर सी. आर. सिवाराम यांनी याचिकेत म्हटले होते की, होमिअोपॅथी आणि युनानी पद्धतीचा वापर करत कोरोनावर उपचार केले जाऊ शकतात. कोर्टाने स्पष्ट केले की, हा नवीन विषाणू आहे. सध्या असे प्रयोग करण्याचे आदेश देता येणार नाहीत.

बातम्या आणखी आहेत...