आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परतीचा मार्ग:विस्थापित काश्मिरींना स्थायिक करण्यासाठी केंद्र सरकारची कसरत, खोऱ्यात काश्मिरी पंडितांसाठी फ्लॅट बनत आहेत, आतापर्यंत 6 हजारपैकी 1500 तयार

बाल्टाल3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगरहून बाल्टाल येथे जाताना वाटेत गांदरबल लागते. इथे काश्मिरी पंडितांसाठी पंतप्रधान विकास पॅकेजमधून नोेकरी मिळणाऱ्या लोकांसाठी कव्हर कॅम्पस तयार करण्याची योजना आहे. या प्रकल्पांतर्गत खोऱ्यात वेगवेगळ्या ठिकाणी विस्थापित काश्मिरी कुटुंबांना स्थायिक करण्याची योजना आहे. पीडब्ल्यूडीचे कर्मचारी अब्दुल मजिद सांगतात, इथे १२ टाॅवरचे काम सुरू आहे. ५-६ टाॅवर जवळपास तयार आहेत. ऑगस्टपर्यंत अर्ध्यापेक्षा जास्त टाॅवरमध्ये लोक राहायला येतील. तथापि, गांदरबलप्रमाणे इतर भागात बांधकामाचा वेग कमी आहे. गांदरबलपासून तीन किमी दूर १२ टाॅवर प्रस्तावित आहेत. इथे एक आठवड्यापूर्वीच काम सुरू झाले. केंद्रीय गृह मंत्रालयानुसार, २०१५ पासून काश्मिरी पंडितांसाठी प्रस्तावित घरांचे फक्त १७% काम पूर्ण होऊ शकले. २०१५ मध्ये जाहीर पंतप्रधान विकास पॅकेजअंतर्गत केंद्र सरकारने काश्मिरी स्थलांतरितांसाठी ३,००० सरकारी नोकऱ्या मंजूर केल्या होत्या. आतापर्यंत १,७३९ स्थलांतरितांना नोकरी दिली आहे. यासंदर्भात महसूल विभागाचे एक अधिकारी सांगतात, हा प्रकल्प सरकारसाठी महत्त्वाचा आहे. एका अन्य अधिकाऱ्याने सांगितले, काश्मिरी पंडितांना स्थायिक करण्याच्या हेतूने ही चांगली कल्पना आहे. २००८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी या रोजगार पॅकेजची घोषणा केली होती. या पॅकेजमधील मंजूर ३,०० पदांपैकी २,९०५ पदे भरली होती. त्यानंतर मोदी सरकारने सुमारे ६ हजार घरांची घोषणा केली. तसेच ९२० कोटी खर्चातून नोकरी दिली जाईल. या वर्षी फेब्रुवारीपर्यंत केवळ १,०२५ घरांचे बांधकाम अंशत: पूर्ण झाले आहे. ५०% घरांचे काम अद्याप सुरू झाले नाही. त्यामुळेच पंतप्रधान पॅकेजअंतर्गत रोजगार मिळवणाऱ्या लोक घरांची प्रतीक्षा करत आहेत. अनेक ठिकाणी बनलेल्या निवासी संकुलांमध्ये कर्मचाऱ्यांना राहावे लागत आहे. नागरिक परत येत असल्याबाबत येथील काश्मिरी नागरिकांचे म्हणणे आहे की, इकडे-तिकडे पिंजऱ्यांमध्ये टाकल्यामुळे काश्मिरी पंडित परत येऊ शकणार नाहीत. तुम्ही भिंत बांधून ठेवाल तर कसे चालेल? लोक पिंजऱ्यात आणि दहशतीच्या सावटाखाली कसे राहू शकतील?

२७४४ साठी लवकरच निविदा प्रक्रिया, ६ भागात आले आहेत सरकारच्या मते, १४८८ घरे जवळपास तयार आहेत. २,७४४ घरांसाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. अनेक स्थलांतरित वेसु (कुलगाम), मट्टन (अनंतनाग), हाल (पुलवामा), नटनसा (कुपवाडा), शेखपोरा (बडगाम)आणि वीरवान (बारामुल्ला) मध्ये सध्याच्या निवासी संकुलात राहत आहेत. उल्लेखनीय म्हणजे जम्मू-काश्मिरात ६४,८२७ नोंदणीकृत स्थलांतरित कुटुंबे आहेत. त्यामध्ये ६०,४८९ हिंदू, २,६०९ मुस्लिम आणि १,७२९ शीख कुटुंबे आहेत.

२ एप्रिलला काश्मिरी नववर्षाचा कार्यक्रम, भागवत संबोधित करणार
जेके पीस फोरमच्या मते, दोन एप्रिल रोजी काश्मिरी नववर्षदिनी शारिका मंदिरात पूजेसह शेर-ए काश्मीर पार्कमध्ये कार्यक्रम होईल.संजीवनी शारदा केंद्रातर्फे आयोजित या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत व्हर्च्युअली संबोधित करतील.

बातम्या आणखी आहेत...